गृहमंत्री आणि उद्योगमंत्र्यांचा कलगी तुरा

मुंबई: मंत्रिमंडळाच्या बैठकीत गृहमंत्री आर. आर. पाटील आणि उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यात सवाल जबाबांचा कलगी तुरा चांगलाच रंगला.

राणे यांनी नुकत्याच जाहीर केलेल्या राज्याच्या औद्योगिक धोरणावर आबांनी तोंडसुख घेतले. शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करून काढून घ्यायच्या आणि त्यावर श्रीमंतांनी इमले उठवायचे; हे कसले धोरण; असा सवाल आबांनी केला. त्यावर राणे उखडले आणि त्यांनी आबांना टोला लगावला. सामाजिक बांधिलकी आम्हालाही कळते. मात्र केवळ चांगल्या भाषणातून नव्हे; तर उद्योगाच्या वाढीतून गरिबी दूर होते; असे त्यांनी सुनावले.

संधी मिळताच राणेंनी आबांना लक्ष्य केले. राज्यात पोलिसांवर कुणाचाही वाचक राहिलेला नाही आणि पोलिसांचा कुणाला धाक नाही; अशी टीका राणे यांनी गृहमंत्र्यांवर केली. त्यावर पाटील यांनीही; साध्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्याही बदलीचे अधिकार माझ्याकडे नाहीत. सारख्या मुख्यमंत्र्यांकडे खेट्या घालाव्या लागतात; असे प्रत्युत्तर दिले.

बदल्यांसंदर्भात राणे यांच्या नेतृत्वाखाली नियुक्त करण्यात आलेल्या समितीचा अहवाल लवकर द्या; अशी मागणी करून पाटील यांनी; अशा समित्या नेमून गृहमंत्र्यांचे अधिकार चांगलेच वाढविले आहेत; अशा शब्दात खिल्ली उडविली.

Leave a Comment