‘तलाश’ आणि ‘खिलाडी’ १०० कोटीपासून दूरच

गेल्या आठ दिवसापूर्वी रिलीज झालेला अमीर खानचा बहुचर्चित ‘तलाश’, व अक्षय कुमारचा ‘खिलाड़ी ७८६’ हे दोन्ही मोठे सिनेमे मोठी कमाई करतील अशी सर्वांचीच अपेक्षा होती, मात्र तसे काहीच घडले नाही. रेकॉर्ड तोडतील अशी अपेक्षा फोलच ठरली आहे. एवडेच नव्हे तर १०० कोटीच्या क्लबमध्ये साधी एंट्री सुद्धा करता आली नाही.

अक्षयच्या ‘खिलाड़ी’ ला तसे पहिले तर सिंगल स्क्रीनवर चांगला रिस्पॉन्स भेटला. तर ‘तलाश’ने मल्टिप्लेक्सवर चांगली कमाई केली. आमिरचा हा सिनेमा ओवरसीज ऑडियंसला पसंद पडला, तर अक्षयचा हा सिनेमा त्या तुलनेत खूपच मागे राहिला आहे. तसे पाहिले तर आमिर आणि अक्षयचा हा सिनेमा असल्याने हवा तसा चार्म या दोन्ही सिनेमात नव्हता.

एक ट्रेड सोर्सने दिलेल्या माहितीनुसार ‘खिलाडी हा सिनेमा प्रेक्षकांना पसंत पडला नाही. त्यामुळेच या सिनेमाला अपेक्षेनुसार कलेक्शन मिळाले नाही. जेवढी या सिनेमाने कमाई केली आहे, त्याचे क्रेडिट अक्षयला दिले पहिजे. त्याच्या स्टार पावरला सुद्धा प्रेक्षकाने काहीसे नाकारल्याने अपेक्षेप्रमाणे कमाई करता आली नाही. दुसरीकडे ‘तलाश’ सारख्या सस्पेंस सिनेमाला सूद्धा जादा लाइफ मिळाली नाही. सुरुवातीला या सिनेमाला मिक्स्ड रिस्पॉन्स मिळाला होता. या सिनेमाने थोडीसी कमाई केली. मात्र सिनेमासाठी जास्त पैसे खर्च करण्यात आल्याने फारसा नफा झाला असेल असे वाटत नाही.
‘तलाश’ या सिनेमाची कमाई १८ दिवसात ८५ कोटी रुपये झाली आहे. तर ११ दिवसात ‘खिलाड़ी’ च्या खात्यावर ६० कोटी रुपये जमा झाले आहेत. या आकड्याना अजून टैक्स लागलेला नाही.