भाऊच तोडेल माझे रेकॉर्ड-करीना

करीना कपूर गेल्या काही दिवसापूर्वी जरी सैफ अली खानची पत्नी झाली असली, तरी पण तिचे माहेरवरील प्रेम काही केल्या कमी होत नाही असे दिसते. सतत ती माहेरच्या मंडळीना मोठे म्हणत असते. आतापर्यंत करीना कपूरला फिल्म फेयर अवॉर्ड फंक्शन्समध्ये सहा अवॉर्ड मिळाले आहेत. मात्र हे अवॉर्डचे रेकॉर्ड करीनाचा भाऊ रणबीर कपूरच मोडेल असे तिला वाटते.

गेल्या काही दिवसापूर्वी ती दिल्ली येथील एका फंक्शन्समध्ये सहभागी झाली होती. यावेळी एका इंटरव्यूप्रसंगी करीना म्हणाली, ‘ तिला आतपर्यंत सहा फिल्म फेयर अवॉर्ड मिळाले आहेत. मात्र तिला पूर्ण विश्वास आहे की, येत्या काळात लवकरच रणबीर कपूर तिला अवॉर्डच्या बाबतीत मागे टाकेल. यावेळी तिने रणबीरच्या अभिनय शैलीचे सुद्धा तोंड भरून कौतुक केले. एवडेच नव्हे तर आजोबा राज कपूरने १२ फिल्म फेयर अवॉर्ड मिळवले होते त्याच्या सुद्धा तो जवळपास जाईल.’

लहानपनापासून मी स्वपन बघत होते की मी फिल्म फेयर अवॉर्ड जिंकत आहे आणी त्यानंतर मी स्पीच देत आहे. मला येत्या काळात देखील अवॉर्ड मिळतील, मात्र माझ्या घरीच माझा कॉम्पिटिटर हा माझा भाऊ रणबीर असणार आहे. माझा विश्वास आहे की येत्या काळात, रणबीर कपूरच माझे रेकॉर्ड तोडेल आणि तो माझ्यासाठी सर्वात आंनदाचा क्षण असेल असेही करीना म्हणाली.

Leave a Comment