समुद्रात यंदा करता येणार नववर्षाची पार्टी

मुंबई दि.२० – मुंबईच्या अरबी समुद्रात यंदा नववर्षाची पार्टी व्यावसायिक क्रूझवर नागरिकांना करता येणार असून त्यासाठी यदा परवानग्या दिल्या जाणार आहेत असे मुंबई पोलिस उपायुक्त कृष्णप्रकाश यांनी सांगितले. यंदा अशा पार्ट्या झाल्या तर मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्यानंतर प्रथमच अशा पार्ट्या साजर्याग होणार आहेत. २६/११ ला मुंबईवर झालेल्या हल्ल्यात पाकिस्तानी दहशतवादी समुद्रमार्गेच मुंबईत घुसले होते व तेव्हापासून अशा पार्ट्या ना परवानगी देणे बंद करण्यात आले होते. यंदा मात्र परवानगी देण्यात येणार आहे.

याविषयी अधिक माहिती देताना उपायुक्त कृष्णप्रकाश म्हणाले की छोट्या बोटींवर खासगी पार्टी करायला परवानगी लागणार नाही मात्र व्यावसायिक क्रूझवर पार्टी करण्यासाठी पोलिसांची तसेच मुंबई पोर्ट ट्रस्ट व सीमाशुल्क विभागाची परवानगी लागणार आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री गेटवे जवळील पाच जेटींवर कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून तट सुरक्षा दलाच्या १७ गस्ती बोटी रात्रभर समुद्रात गस्त घालणार आहेत. गेटवे जेटींवरील पोलिस अलिबाग व मांडवा भागातून येणार्यात बोटींवर लक्ष ठेवतील. समुद्रात पाच नॉटिकल मैलांपर्यंतच्या अंतरावरील सुरक्षेची पूर्ण जबाबदारी पोलिसांवर आहे.

अशा पार्ट्या आयोजित करणार्याट संयोजकांनी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरच त्यांना परवानगी दिली जाणार आहे.गतवर्षीही अनेक आयोजकांकडून परवानगी देण्यासंदर्भात चौकशी करण्यात आली होती मात्र त्यावेळी कुणालाच परवानगी दिली गेली नव्हती असेही समजते.

Leave a Comment