नवी दिल्ली दि.१७ – आगामी दोन ते तीन वर्षात म्हणजे २०१५ सालापर्यंत ऑन लाईन शॉपिंगचा भारतातील व्यवसाय ३४.२ अब्ज अमेरिकी डॉलरवर जाईल असे संकेत मिळत आहेत. होम शॉप१८ डॉट कॉम चे सीइओ सुदीप मल्होत्रा यांनी ही माहिती दिली.

मल्होत्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार भारताता सध्या मोबाईल युजरची संख्या २७ दशलक्ष आहे. पैकी चार टक्के युजर मोबाईलवर इंटरनेटचा वापर करून ऑनलाईन शॉपिंग करतात. आगामी चार वर्षात ही संख्या २० टक्कयांनी वाढेल असा अंदाज आहे. सध्याचा ट्रेंड पाहता ही वाढ दरवर्षाला ५७ टक्कयांवर जाईल असे दिसून येत आहे. २०१५ पर्यंत मोबाईल युजरची संख्या बारा कोटींवर जाण्याची शक्यता आहे आणि परिणामी ऑन लाईन शॉपिंगचा उद्योग ३४.२ अब्ज डॉलर्सवर पोहोचेल असे संकेत मिळत आहेत.
ऑन लाईन शॉपिंग व्यवसायातील अनेक नामवंत कंपन्यांनी १२ डिेसेंबर रोजी ग्राहकांसाठी खास सवलती आणि योजना जाहीर केल्या होत्या तेव्हा होम शॉप १८ च्या ग्राहकसंख्येत एका दिवसांत ३०० पट वाढ झाली असेही मल्होत्रा यांनी सांगितले. आज ऑन लाईन शॉपिंगची सुविधा देणार्या३ शेकडो साईटस आहेत आणि आगामी काळात त्यात खूप मोठी भर पडणार आहे असे सांगून मल्होत्रा म्हणाले की ई कॉमर्स भारतात गेमचेंजर म्हणून भूमिका बजावेल असाही तज्ञांचा होरा आहे.