थंडीमुळे गोठली एटीएम मशीन्स

सिमला दि.१७ – गेले कांही दिवस सतत होत असलेल्या हिमवर्षावामुळे हिमाचल प्रदेशमधील जनजीवन विस्कळीत झाले असून तेथील रहिवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः लाहौल स्पिती जिल्ह्यातील परिस्थिती अतिशय बिकट असून येथील रहिवाशांना एटीएममधून पैसे काढण्यासाठी तासनतास प्रतीक्षा करावी लागत आहे. कारण एटीएम मशीन्सही गोठून गेल्याने ती चालत नाहीत. त्यामुळे बँक अधिकार्यांलना अगोदर ही मशीन्स उष्णता पुरवून  गरम करावी लागत आहेत असे समजते.

पर्यटकांसाठी हिमवर्षाव ही आनंदाची पर्वणी असली तरी रहिवाशांना मात्र सततच्या हिमवर्षावाने अनेक त्रास भोगावे लागत आहेत. गाड्या सुरू होत नाहीत कारण डिझेल गोठते. नळाला पाणी येत नाही कारण पाण्याचे पाईपातच बर्फ होते. त्यामुळे अगोदर दोन बादल्या गरम पाणी ओतून पाईप गरम करावे लागतात व मगच नळाला पाणी येऊ शकते. टिव्हीच्या डिशवर बर्फाचे थर साठतात त्यामुळे टिव्ही प्रसारण बंद पडते. इतकेच नव्हे तर सेल्युलर फोन, भिंतीवरची घड्याळेही बंद पडतात. पुढील चार महिने येथील रहिवाशांना या सर्व त्रासांना तोंड द्यावे लागणार असून रस्ते वाहतूकही बर्फामुळे बंद पडल्याने आता राज्य सरकारकडून चालविली जाणारी हेलिकॉप्टर सेवा इतकाच संपर्काचा मार्ग त्यांना उपलब्ध आहे.

हिमाचल मध्ये या भागात ४ नोव्हेबरला विधानसभेसाठी मतदान झाल्यानंतर तेथील मतदान यंत्रेही निवडणक आयोगाने तातडीने कुलूला हलविली असल्याची माहिती असून अन्यथा ही यंत्रेही गोठली असती व मतमोजणीत अडथळे येऊ शकले असते असेही निवडणूक अधिकार्यां्नी सांगितले. लाहौल स्पिती भागात या काळात रडायचे म्हटले तरी डोळ्यातील अश्रू गालावर येताच त्याचे बर्फात रूपांतर होते असेही हे अधिकारी म्हणाले.

Leave a Comment