केंद्राच्या निम्म्या संस्थांना नेहरू गांधींचे नांव

नवी दिल्ली दि.१७ -केंद्र सरकार चालवित असलेल्या ६० संस्था आणि योजना नेहरू गांधी घराण्याच्या नावानेच चालविल्या जात असल्याची माहिती माहिती हक्क अधिकारात केलेल्या अर्जाला मिळालेल्या उत्तरातून स्पष्ट झाली आहे. आरटीआय कार्यकर्ते रमेश वर्मा यांनी ही माहिती अर्जान्वये मागविली होती. विशेष म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नावाने यातील केवळ चार संस्था आहेत असेही यात उघड झाले आहे.

नियोजन मंत्रालयाकडून जाहीर केलेल्या माहितीनुसार केंद्र चालवित असलेल्या  ५८ संस्था आणि योजनांनैकी २७  नेहरू गांधी घराण्याच्या नावाने चालविल्या जात आहेत. या संस्था जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधीआणि राजीव गांधी यांच्या नावाच्या असून त्यात नहेरूंच्या नावाच्या ३, इंदिरा गांधी यांच्या नावाच्या ८ तर राजीव गांधी यांच्या नावाच्या १६ संस्था व योजना आहेत. अन्य संस्था किवा योजनांमध्ये कस्तुरबा गांधींच्या नावाने १, मौलाना अबुल कलम यांच्या नावाच्या ३, लाल बहादूर शास्त्री यांच्या नावाने २, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावाने १, अटल बिहारी वाजपेयी १ , रविद्रनाथ टागेार १, झाकीर हुसेन १ व जगजीवनराम यांच्या नावाने १ संस्था वा योजना राबविली जात आहे.

Leave a Comment