अदृष्य करणारा पोशाख

हॅरी पॉटर मधला ’इन्विजिबिलिटी क्लोक’ आठवतोय ना? सिनेमा बघतानाच किती भारी वाटते? आपल्याजवळही असा ’क्लोक’ हवा होता, असे आपल्याला सहज वाटून जाते. कॅनडाच्या एका कंपनीने तर चक्क आपण असा ’क्लोक’ तयार केल्याचा आणि या खास प्रकारच्या कपड्यामुळे आपण अदृष्य होऊ शकतो, असा दावा कंपनीने केला आहे.
 
खासकरुन लढाईसाठी तैनात करण्यात आलेल्या सैनिकांसाठी याप्रकारचे कापड तयार करण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. तसेच याला अमेरिकेच्या लष्कराचा पाठिंबा असल्याचेही कंपनीने सांगितले आहे.
 
’डेली मेल’ या वृत्तपत्रात दिलेल्या माहितीनुसार, या खास प्रकारच्या कपड्यावर प्रकाश किरण पडल्यास ते परावर्तित होत नाहीत. त्यामुळे एखाही वस्तू अदृष्य झाल्यासारखी वाटते. तसेच, रात्रीच्या वेळी दिसण्यासाठी वापरण्यात येणार्यार चष्म्याचाही या कपड्यावर परिणाम होत नसल्याचे कंपनीने म्हटले आहे.
 
’हायपरस्टील्थ बायोटेक्नॉलॉजी कॉर्पोरेशन’ या कंपनीने हा दावा केला असून, हा प्रकल्प अत्यंत खासगी असल्याचे कंपनीच्या अधिकार्यां नी म्हटले आहे. या प्रकल्पाबद्दल जास्त माहिती देणे शक्य नसल्याचे सांगताना, ज्यांचा या संशोधनावर विश्वास बसत नसेल, त्यांची आम्हाला काळजी नाही. कारण ज्यांच्यासाठी हा खास कपडा तयार करण्यात आला आहे, त्यांना यातील सत्यता माहित आहे असेही कंपनीचे म्हणणे आहे.