आमिर करणार महाभारतावर सिनेमा

डायरेक्टर म्हणून ‘तारे जमीं पर’ या सुपरहिट सिनेमाची निर्मिती करणा-या आमिर खानने ‘धूम 3’ आणि ‘पीके’ या सिनेमाच्या डायरेक्शन नंतर आगामी काळात आणखीन एक नवीन सिनेमाची प्लैनिंग करीत आहे. गेल्या काही दिवसापासून त्याची महाभारतावर आधारित असलेला सिनेमा तयार करण्याची इच्छा आहे. सध्या त्याने हे काम मनावर घेतले असून या आयडियावर आधारित सिनेमाची स्क्रिप्ट लिहण्याचे काम सुरु केले आहे. लवकरच तो या सिनेमाची घोषणा करणार आहे.

काही दिवसापासून काका नासिर हुसैन सोबत ‘जबर्दस्त ‘ आणि ‘मंजिल – मंजिल’ या सिनेमाचा असिस्टेंट डायरेक्टर म्हणून आमिर खानने काम केले आहे. काही दिवसापूर्वी आमिरने ‘तारे जमीं पर’ या सिनेमाचे डायरेक्शन केले होते. आमिरने डायरेक्शन केलेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट झाला होता. मीडियामध्ये सुद्धा त्याला जबरदस्त रेटिंग मिळाली होती. आमिरच्या डायरेक्शनचे खूप जणांनी कौतुक केले होते. आमिरने गेल्या पाच वर्षात डायरेक्टर म्हणून चांगले काम केले आहे.

त्यामुळेच आता आमिरने पुन्हा एकदा डायरेक्शन फील्डमध्ये उतरण्याची प्लैनिंग केली आहे. आमिरने ‘धूम 3’ आणि ‘पीके’ या सिनेमाची शूटिंग पूर्ण झाल्यानंतर नवीन बैनर सुरु करण्याची इच्छा प्रदर्शित केली होती. नवीन सिनेमाच्या कथानकाची आयडिया त्याच्या जवळ आहे. त्यावर तो लवकरच स्क्रिप्ट लिहण्यास सुरुवात करणार आहे. याबाबत बोलतना आमिर म्हणाला, ‘या सिनेमानंतर दुस-या सिनेमाचा अक्टर साइन करण्याऐवजी मी आगमी काळात डायरेक्शन म्हणून सिनेमाची निर्मिती करणे प्रेफर करणार आहे. ‘