रणबीरने केली खानची बरोबरी

गेल्या काही दिवसापासून रणबीर कपूरची डिमांड वाढली आहे. त्यामुळेच रणबीरने कमी वेळातच खान हीरोजची बरोबरी केली आहे. वडिलाच्या सल्ल्यानुसार रणबीर आता त्याच्या सीनियर्स पेक्षा जास्त मागणी तो करीत आहे. आता रणबीर कपूरने जरी १० सिनेमात काम केले असले तरी त्याचे नाव बॉलिवुडच्या ए-लिस्ट मध्ये सामील झाले आहे.

त्यामुळेच गेल्या काही दिवसपासून रणबीरने खान तिकडी सारखीच आता सिनेमाच्या प्रॉफिटमध्ये हिस्सा मागत आहे. काही दिवसपासून आमिर, शाहरुख आणि सलमान खान यांनी काही सिनेमे करीत असताना ही डिमांड ठेवली होती. मात्र ही डिमांड ठेवत असताना रणबीरने त्याच्या सीनियर्सला मागे टाकले आहे. रणबीरने एका सिनेमासाठी नफ्यापेक्षा जास्त टक्केवारी मागितली आहे. रणबीरच्या या आयडिया मागे त्याचे वडील ऋषि कपूरचा हात आहे. आगामी काळात येत असलेला ‘बेशरम’ हा सिनेमा ही अट ठेऊनच रणबीरने कास्ट केला असल्याचे समजते.

सोर्सने दिलेल्या महितीनुसार, ‘ रणबीरने ही डिमांड ठेवल्यानंतर प्रड्यूसर कंपनीने पहिल्यांदा ही डील कॅन्सल केली होती. त्यावेळी सिनेमाचे डायरेक्टर अभिनव कश्यपने सर्वच यूनिटला प्रॉफिट शेयर करण्याची डिमांड ठेवली होती. मात्र त्यानंतर प्रॉडक्शन कंपनीने ही डिमांड मान्य केल्यानंतर सिनेमाचे शूट सुरु झाले आहे. हॉलिवुडप्रमाणे काम करण्यास सुरुवातीला प्रॉडक्शन हाउसने नकार दर्शविला होता मात्र काही दिवसानंतर त्याच्यात सेटलमेट झाली. या सर्व घडामोडीमुळे रणबीरचे स्टेप मात्र इंडस्ट्रीमध्ये स्ट्रॉन्ग झाले आहेत.

ट्रेड आनालिस्ट अमोद मेहराच्या मते, ‘रणबीरने आतापर्यत केलेल्या कामाचे कौतूक झाले आहे. सक्सेस रेटचा हिशोब केला तर यंग स्टार ब्रिगेडचा तो सुपरस्टार आहे. त्यासोबत टैलंट आणि स्मार्ट मार्केटिंग सुद्धा चांगले आहे. सर्वचजन पैसा कमविन्यासाठी काम करीत असतो. त्यामुळे त्याने केलेली डिमांड योग्य आहे असे मला वाटते. गेल्या काही दिवसपासून प्रड्यूसर्सने दिलेली अमाउंटने संतुष्ट होण्यचा ट्रेंड मात्र सध्या बदलत आहे.’