किंगखान थिरकला रानी,प्रिती व बिपाशा सोबत

बॉलीवुडचा किंगखान शाहरूखने ‘टेम्पटेशन्स रिलोडेड टूर’ च्या वेळी एक्ट्रेस रानी मुखर्जी, प्रिती जिंटा, बिपाशा बसु सोबत थिरकला. यावेळी किंगखानने तीनों एक्ट्रेससोबत डान्स करीत खूप एन्जॉय केला. कित्येक दिवसानंतर तो स्टेज शो करताना दिसला. त्याचा हा परफॉर्म पाहून ब-याच दिवसानंतर त्याचे चाहते खुश झाले आहेत.

जकार्ताच्या सेंटुअल इंटरनेशनल कन्वेंशन सेंटरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कॉन्सर्टमध्ये शाहरूख खान सहभागी झाला होता. त्याने यावेळी त्याच्या चाह्त्यचे मनोरंजन केले. यावेळी स्टेजवर ज्या पद्धतीने शाहरूखने बाइक घेऊन एंट्री मारली ते बघून सर्वजन हैराण झाले होते. यावेळी त्याने केलली एन्ट्री पाहून त्याच्या चाहत्याने खूप एन्जॉय केला.

यावेळी बोलताना किंगखान म्हणाला, ‘ यावेळी मला जकार्तामध्ये फिरण्याचा मोका मिळाला नाही. मात्र येथील सौंदर्य पाहून कोणीही या जागेचे कौतुकच करेल. मला याठिकानी खूप फिरण्याची इच्छा होती, मात्र मला फिरता आले नाही. मी जकार्ताचे सौंदर्य पाहून खुश झालो आहे. त्यासोबतच एंटरटेनमेंट इंडस्ट्रीचा पार्ट असल्याने या आयोजित करण्यात आलेल्या शो हा माझ्यासाठी चांगला अनुभव ठरला.’