अजय देवगनला इंडस्ट्रीमध्ये आतापर्यंत कित्येकवेळा सलमान खानने सपोर्ट दिला आहे. नुकताच ‘सन ऑफ सरदार’ आणि ‘जब तक है जान’ या दोन सिनेमाच्या रिलीजवरून अजय आणि शाहरुखमध्ये खूप वाद झाला. यावेळी सलमान खानने अजयलाच फुल सपोर्ट केला होता. मात्र आता अजय शाहरुखच्या आगामी काळात येत असलेल्या ‘चेन्नैइ एक्सप्रेस’ या सिनेमात खास रोल करीत आहे …आणि हे सर्व काही अजयचा बेस्ट फ्रेंड व गोलमाल सीरीजचे डायरेक्टर रोहित शेट्टी यांच्यामुळे शक्य झाले आहे. तेच ‘चेन्नैइ एक्सप्रेस’ सिनेमा डायरेक्ट करत आहेत.
या सिनेमात अजय देवगन एक स्पेशल आणि दमदार रोल करणार आहे. ही बातमी ऐकून सर्वाना थोडासा धक्का बसला असेल. कारण की ‘सन ऑफ सरदार’ आणि ‘जब तक है जान’ या सिनेमाच्या वादात अजय आणि शाहरुखमध्ये एक प्लैटफॉर्म तयार झाला होता. त्यामुळे दोघांना एकत्रित आणणे हे टफ काम होते. सूत्रोंने दिलेल्या माहितीनुसार हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर शाहरुख आणि अजयच्या दोस्तीमुळे सलमान आणि अजय यांच्या दोस्तीवर फरक पडू शकतो.
तसे पहिले तर सलमान आणि शाहरुख हे इंडस्ट्रीमधील एकमेकाचे कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. एवढेच नव्हे तर गेल्या काही दिवसापासून बॉलिवुडमध्ये शाहरुख आणि सलमानचे दोन वेगवेगळे कैंप तयार झाले आहेत. त्यामुळे येत्या काळात आता अजयसोबत सलमान कसा रिऐक्ट होतो हे पाहणे ओत्सुक्याचे ठरणार आहे.