विद्या-सिद्धार्थ झाले ‘एक दुजे के’

आपल्या एक अदाने लाखों दिलाचे धडकन वाढविणारी बॉलीवुड स्टार विद्या बालन आता ‘मिसेज रॉय कपूर’ झाली आहे. प्रोडक्शन कंपनी यूटीवीचे सीईओ सिद्धार्थ रॉय कपूर आणि विद्या शुक्रवारी सकाळी विवाहबद्ध झाले. चैंबूर मधील एका मंदिरात विद्या-सिद्धार्थचा विवाह पंजाबी आणी तमिळ रिती रिवाजानुसार पार पडला.

सूत्रोंने दिलेल्या माहितीनुसार यावेळी विद्या आणी सिद्धार्थ यांच्या परिवारातील जवळचे नातेवाईक उपस्थित होते. शुक्रवारी पहाटे ४.४५ वाजता त्यांचा विवाह पार पडला. विवाहानंतर विद्या बालन हिच्या चैंबूर येथील घरी एक छोटीसी पार्टी आयोजित करण्यात आली आहे. शनिवारी चेन्‍नई मध्ये रिसेप्‍शन आयोजित करण्यात आले असल्याचे समजते.

यापूर्वीच ११ डिसेबर रोजी विद्याच्या घरी संगीत सेरेमनी पार पडली होती. लग्नाच्या पूर्वीच प्री-वेडिंग बैश पार पडला आहे. या पार्टीमध्ये सिद्धार्थ आणि विद्याच्या कुटुंबिय व अभिनेत्री रेखासह बॉलीवुडचे स्टार सहभागी झाले होते. विद्या बालनच्या खार येथील घरात मेहंदीची रस्म पार पडली. यावेळी लीजेंड एक्ट्रेस रेखा उपस्थित होती. यावेळी विद्या बालनचे स्कूल आणि कॉलेजचे दोस्त गैरहजर होते. यावेळी विद्याने दक्षिण भारतीय साडी परिधान केली होती.

लग्ना नंतर विद्या आणि सिद्धार्थ कैरबियन बेटावर हनिमूनसाठी लवकरच जाणार आहेत. त्यासाठी त्यानी काही दिवसापूर्वीच येथील फेमस हॉटेल ही बुक केले असल्याचे समजते.