लवकरंच रेल्वेची भाडेवाढ

नवी दिल्ली: केंद्र सरकारचा आर्थिक सुधारणांचा वेग वाढणार असूनत्याचा परिणाम म्हणून लवकरंच रेल्वेच्या दारात वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे डिझेल अणि गेसवरील अनुदानात घट होण्याचे संकेत सरकारने दिले आहेत.

रेल्वेची आर्थिक परिस्थिती खूपच खालावली असून रेल्वेचा मोठ डोलारा सांभाळण्यासाठी भाडेवाढ अटळ असल्याचा दावा रेल्वे राज्यमंत्री सूर्यप्रकाश रेड्डी यांनी केला.

यापूर्वी तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बेनार्जी यांच्या कडव्या विरोधामुळे रेल्वेची भाडेवाढ करता आली नाही. मात्र रिटेल क्षेत्रात थेट गुंतवणुकीच्या मुद्द्यावरून झालेल्या मतदानात विजय संपादन केल्यानंतर सरकारच्या आत्मविश्वासात मोठी भर पडली असून त्यामुळे आर्थिक सुधारणांच्या कार्यक्रमाला वेग येणार आहे

Leave a Comment