नवी दिल्ली: आकाशात लवकरंच होणाऱ्या उल्का वर्षावादरम्यान आकाशात तब्बल ६० रंगछटांची रंगपंचमी पाहण्याची संधी अवकाश निरीक्षकांनाच नव्हे तर सर्वसामान्य रसिकांना उपलब्ध होणार आहे.

नवी दिल्ली: आकाशात लवकरंच होणाऱ्या उल्का वर्षावादरम्यान आकाशात तब्बल ६० रंगछटांची रंगपंचमी पाहण्याची संधी अवकाश निरीक्षकांनाच नव्हे तर सर्वसामान्य रसिकांना उपलब्ध होणार आहे.
अवकाशात १३ आणि १४ डिसेंबर रोजी पहाटे उल्का वर्षाव होणार आहे. या वर्षाव दरम्यान केवळ एका तासात ६० विविध रंगछटांची उधळण नजरबंदी करणारी ठरणार आहे. या उल्का वर्षावाचे वैशिष्ट्य म्हणजे या वर्षावाचा स्त्रोत धूमकेतू नसून एखाद्या छोट्या दगडासारखा दिसणारा ग्रह असणार आहे. ३ हजार २०० फ़ाईथोन असे या ग्रहाचे नामकरण करण्यात आले आहे.
विशेषत: दि. १४ डिसेंबरच्या पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास पूर्वदिशेला कोणत्याही उपकरणाशिवाय निसर्गाची ही रंगपंचमी अधिक ठळकपणे पाहता येणार आहे.