कायम स्वरूपी केस रंगविण्यासाठी सोन्याचा वापर

संशोधकांनी केस रंगविण्याचा त्रासातून मुक्तता मिळावी आणि केसांना कायमस्वरूपी रंग प्राप्त व्हावा यासाठी सोन्याच्या नॅनो पार्टिकल्सचा यशस्वी वापर केला असून यामुळे पांढरे केस कायमस्वरूपी तपकीरी रंगात बदलणे शक्य झाले आहे.

यासाठी संशोधकांनी अनेक प्रयोग केले. त्यातील एक म्हणजे पांढरा केस त्यांनी सोन्याच्या संयुगात बुडवून ठेवला तेव्हा तो पिवळसर झाल्याचे आढळले. नंतर त्यांवर ए;इलेक्ट्रोन मायक्रो प्रकिया केली असता हे सोन्याचे नॅनो पार्टिकल केसाच्या आतल्या भागात शोषले जातात असे दिसून आले. हे केस पुन्हा पुन्हा धुतले तरी हा रंग कमी झाला नाही.

फ्रान्समधील सेंटर नॅशनल डे ला रिसर्च संस्थेचे संचालक फिलिप वाल्टर यांच्या या संशोधनात पुढाकार होता. ते म्हणाले की सोन्याच्या नॅनो पार्टिकलचा हा उपयोग हा मोठाच शोध आहे. आता या पार्टिकल्सचा अन्य तर्हेननेही उपयोग करणे शक्य असून मुख्यत्वे वैद्यकीय चिकित्सा पद्धतीत त्याचा उपयोग महत्त्वाचा ठरेल. कॅन्सर ट्रिटमेंटसाठीही हा शोध उपयुक्त ठरू शकणार आहे. प्राचीन ग्रीक रोमन केस रंगविण्यासाठी शिशे धातूचा उपयोग करत असत याचे पुरावे उपलब्ध आहेत. शिशाच्या तुलनेत सोन्याचा या कामी उपयोग होणार असेल तर ते अधिक सुरक्षित होईल असेही फिलिप म्हणाले. हे संशोधन अमेरिकन केमिकल सोसायटी जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे.