पुणे कोकेनचे महत्त्वाचे ट्रान्झीट पॉईंट?

पुणे दि. ११ –  आंतरराष्ट्रीय ड्रग माफिया अमली पदार्थाच्या त्यातही विशेष करून कोकेनच्या व्यापारासाठी भारताचा उपयोग करत असतानाच पुणे हे कोकेनसाठीचे महत्त्वाचे ट्रान्झीट केंद्र बनत असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. पुण्यात गेल्या कांही महिन्यात कोकेन घेणार्यांेची संख्याही लक्षणीयरित्या वाढली असल्याचे आणि त्यात उच्चभ्रू समाजातील लोक आणि परदेशी लोकांचा भरणा अधिक असल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. कोकेनच्या व्यापारात प्रामुख्याने नायजेरिन लोकांचा होत असून पुणे पोलिसांनी कोकेनचा पुरवठा करणार्याय सात नायजेरियनांना पकडले आहे. पैकी दोघांना अटक करण्यात अली आहे तर अन्य पाच जणांना मायदेशी परत पाठविण्यात आले आहे.

पुणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या दहशतवाद विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक सुहृद नाडगौडा २६ नोव्हेंबरला यांनी धानेारी येथून नायजेरियन नागरिक नॉन्सी आणि धानेारी भागातून अजितसिंग यांच्याकडून चार लाख रूपये किमतीचे ३९ ग्रॅम कोकेन व एलएसडी जप्त करून त्यांना अटक केली होती व त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांच्याशी संबंधित असलेल्या चार नायजेरियन नागरिकांना ७ डिसेंबरला मायदेशी परत पाठविले होते. अमली पदार्थविरोधी पथकाचे निरीक्षक सुनील तांबे यांनीही कोंढवा भागातून निकोलस याला ३२ हजार रू. किमतीच्या कोकेनसह ताब्यात घेतले होते. मार्च एप्रिल मध्ये निरीक्षक बाळकृष्ण खुटवळ यांनीही नायजेरियन गॅब्रियल याच्यासह चार महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ४०० ग्रॅम कोकेनसह पकडले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात या कोकेनची किमत १० लाख रूपये होती.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गोवा राज्यात अमली पदार्थ व्यापाराचे प्रबळ जाळे विणले गेले असून येथून येणारे कोकेन भारताच्या अन्य राज्यात व परदेशात पाठविण्यासाठी पुण्याचा ट्रान्झीट पॉईट म्हणून उपयोग केला जात आहे. त्यात आंतरराष्ट्रीय ड्रग माफियाच कार्यरत असून ते नायजेरियन नागरिकांची निवड प्रामुख्याने करतात कारण हे लोक कमी पैशांवर काम करायला तयार असतात.

पुण्यात परदेशी नागरिक आणि परदेशातून शिक्षणासाठी आलेल्यांची संख्या प्रचंड मोठी आहे. नायजेरियन नागरिक बिझिनेस अथवा स्टुडंट व्हिसा घेऊन येतात. मात्र व्हिसाची मुदत संपल्यानंतरही जाणूनबुजून येथेच राहतात. न्यायालयात त्याविरोधात केस दाखल केली गेली की ती अधिक लांबविली जाते. दरम्यानच्या काळात हे लोक ड्रगचा व्यापार करतात. पेरू, बोलिव्हिया, ब्राझील देशातून कोकेन भारतात येते आणि पुण्यातून कुरिअर सेवेमार्फत ते बाहेर पाठविलेजाते. पुण्यात विद्यार्थी संख्या खूप मोठी असल्याने हे विद्यार्थी सतत कुरियर सेवेचा उपयोग करत असतात त्याचाच फायदा ड्रग पाठविण्यासाठी घेतला जातो असेही पोलिसांकडून सांगण्यात आले.

२०१० साली पुण्यात आत्तापर्यंतचा सर्वात मोठा म्हणजे सुमारे चार कोटी रूपये किमतीची ड्रग्ज पकडली गेली होती. कोकेन त्याची शुद्धता आणि क्वालिटी प्रमाणे २५०० ते ७००० रूपये ग्रॅम दराने पुण्यात विकले जाते असेही समजते.

Leave a Comment