वॉल मार्टने भारतात ‘लॉबिंग’साठी खर्च केले १२५ कोटी

नवी दिल्ली: भारतीय बाजारपेठेत प्रवेश मिळविण्यासाठी वोल मार्टने चार वर्षात १२५ कोटी रुपये खर्च केल्याचा खुलासा कंपनीने केला आहे. भारतीय जनता पक्षाने या प्रकरणी चौकशीची मागणी संसदेत केली.

भारतात ‘लॉबिंग’ बेकायदेशीर असूनही कंपनीने भारतात गुंतवणूक करण्यास वाव मिळविण्यासाठी ‘लॉबिंग’वर मोठ्या प्रमाणावर खर्च केल्याचे कंपनीने वोशिन्ग्तन येथे जाहीर केले आहे. या प्रकरणी कोणाला लाच दिली गेली; याची चौकशी करावी; अशी मागणी भाजपचे खासदार रविशंकर प्रसाद यांनी केली आहे.

भारतीय संसदेने रिटेल क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणुकीला परवानगी देण्याचा निर्णय नुकताच संमत केला आहे.