बॉलीवुडमध्ये सध्या मानधन जास्त घेण्यासाठी मोठी चुरस लागली आहे. कोण मानधन जास्त घेतो तो मोठा स्टार असे एक समीकरण तयार झाले आहे. त्यामुळेच गेल्या काही दिवसापासून सर्वानीच मानधन वाढविले आहे. सध्या हॉलीवुड प्रोजेक्टमध्ये बीजी असलेल्या ऋतिक रोशनने एक जाहिरात करण्यासाठी २० कोटी रूपयाची आलेली ऑफर नाकारली आहे.
सूत्रोंने दिलेल्या माहितीनुसार सध्या ऋतिक रोशनकडे हॉलीवुडमधील काही प्रोजेक्ट सुरु आहेत. त्यामध्ये तो सध्या तर खूप बीजी आहे. त्याला नुकतीच एक सेलफोन कंपनीच्या प्रोडक्टची जाहिरात करण्यासाठी कंपनीने त्याला २० कोटी रूपयाची ऑफर दिली होती. मात्र ही अमाउंट कमी होत असल्याने ऋतिकने नकार दर्शविला आहे. त्याशिवाय ज्या मोबाइल कंपनीसाठी तो ही जाहिरात करणार आहे. त्यामध्ये त्याला हवे असलेले फिचर्स नसल्यामुळे त्याने ही जाहिरातीची ऑफर नाकारली असल्याचे समजते.
याबाबत ऋतिक रोशनची प्रतिक्रिया जाणून घेतली असता तो म्हणाला की, त्याने या मोबाइल कंपनीची जाहिरात केली, तर त्याचे चाहते प्रभावित होऊन हा मोबाइल खरेदी करतील. मात्र त्याचे फीचर्स चांगले मिळाले नाहीत तर सर्वाना तो खोटे बोलतो असे वाटेल. यामुळेच त्याने ही जाहिरातीची ऑफर नाकारली आहे.