नवी दिल्ली दि. ८- भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचे प्रणेते, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर गुरगांवच्या मेदांता रूग्णालयात उपचार सुरू आहेत. अण्णा अजून आयसीयूमध्येच असले तरी उपचारांना चांगला प्रतिसाद देत असल्याचे समजते.

अण्णा हजारे यांची हरयानातील अण्णा समन्वय समितीच्या सदस्यांसोबत ९ डिसेंबर रोजी बैठक होणार आहे. मात्र शुक्रवारी सकाळीच अण्णांना पित्ताचा त्रास होऊ लागला व अशक्तपणा आल्याने त्यांना तातडीने मेदांता इमर्जन्सी वॉर्ड मध्ये दाखल करण्यात आले व त्यानंतर त्यांना आयसीयू मध्ये हलविले गेले असे अण्णांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.
मेदांतामधील अण्णांवर उपचार करणार्या डॉक्टरांनी मात्र अण्णांना कांही खासगी कारणांनी आयसीयूत ठेवले असल्याचे व प्रकृतीसाठी नसल्याचे सांगितले आहे.