वैरायटी रोल करणार- रानी मुखर्जी

अमीर खान सोबतचा ‘तलाश’ हा सिनेमा हिट झाल्याने खंडाला गर्ल रानी मुखर्जी सध्या भलतीच खुश आहे. काही दिवसापूर्वी तिचा ‘अईया’ हा सिनेमा आला होता. मात्र त्या सिनेमातील तिची मराठी मुलीची भूमिका केली होती. मात्र ती भूमिका प्रेक्षकांनी नाकरल्याने राणी काहीसी चिंतीत होती. मात्र ‘तलाश’ हा सिनेमा हिट झाल्याने रानीला थोडा धीर आला आहे.

अमीर सोबतच्या ‘तलाश’ या सिनेमात तिने एका दुखी पत्नी आणि मुलाच्या मॄत्यूच्या गममध्ये बुडालेल्या महिलाचा रोल केला होता. रानी मुखर्जी या भूमिकेमुळे खुश आहे. आगामी काळात तीला रोलमध्ये वैरायटी आणायची आहे. यावेळी बोलता रानी म्हणाली, ‘नेहमीच आव्हानात्मक भूमिका करायला आवडतात. मी नेहमीच टाइपड रोल करण्याचे टाळत असते. तशा स्वरूपाचा रोल माझ्यासोबतच प्रेक्षकांना देखील आवडत नाही.’

राणीने तिच्या १७ वर्षाच्या अभिनय कारकिर्दीत ब-याच सिनेमातून आव्हानात्मक भूमिका केली आहे. यामध्ये ‘राजा की आएगी बारात’, ‘मेंहदी’, ‘ब्लैक’, ‘युवा’, ‘नो वन किल्ड जेसिका’, ‘अईया’ या सिनेमाचा समावेश आहे. मधल्या काळात रानी मुखर्जी थोडीसी मोठ्या पडदयापासून दूर राहिली होती.

Leave a Comment