गेल्या काही दिवसापासून सलमान खान ‘दबंग-२’ च्या शूटसाठी बांद्रा येथील महबूब स्टूडियो मध्ये व्यस्त आहे. याठिकाणी त्याला भेटन्यासाठी त्याला स्पेशल विजिटर येत असतात. मात्र हा स्पेशल विजिटर दुसरा तिसरा कोण नसून मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान होता. यावेळी अमिरने सलमानची भेट घेऊन मनसोक्त गप्पा मारल्या.
आमिरने घेतली सलमानची भेट
सुत्रने दिलेल्या महितिनुसार आमिर हा सलमान खानच्या सेट शेजारीच शूट करीत होता. त्यावेळी सलमान हा आमिरला भेटन्यासाठी आला. दोघाने यावेळी ‘अदांज अपना अपना’ या सिनेमातील काही जोक्स सांगून एकमेकाची करमणूक केली. सलमान खान, आमिरचा हा आदर भाव पाहून खूपच खुश झाला. दोघानी खूप वेळपर्यंत गप्पा मारल्या. सलमानने यावेळी आमिरला त्यादिवशी केलेल्या शूटचे फुटेज दाखविले.
दोन्ही खान एकत्रित येणे हे खूप कमीवेळा घडते. त्यामुळे यावेळी युनिटची मात्र चांगली करमणूक झाली. सलमानचा दबंग-२ हा सिनेमा २१ डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. या सिनेमाकडून सलमानच्या खूप अपेक्षा आहेत. त्या आगामी काळात पूर्ण होणार की नाही यासाठी मात्र काही दिवस वाट पाहवी लागणार आहे.
