मोबाइल फोनवरील फोटो डाउनलोडच्या बाबतीत बॉलीवूडची अभिनेत्री कैटरीना कैफने बाजी मारली आहे. चिकनी चमेलीने सलग चौथ्या वर्षी हा कीर्तिमान प्राप्त केला आहे. एयरटेल मोबीट्यूडच्या वतीने २०१२ साली करण्यात आलेल्या सर्वेक्षणनुसार कैटरीना कैफची विविध फोटो सर्वधिक डाउनलोड होत असल्याचे पुढे आले आहे. कैटरीनानंतर डाउनलोडच्या बाबतीत करीना कपूर, प्रियंका चोपड़ा, अनुष्का शर्मा आणि विद्या बालन यांचा क्रमांक लागतो.
मोबाइलवरील डाउनलोडमध्ये कैटरीनाची बाजी
अभिनेत्याच्या बाबतीत वालपेपर डाउनलोड श्रेणीत शाहरुख खान सर्वात पुढे आहे. गेल्या पाच वर्षात यास्थानी सलमान खान आणि रणबीर कपूर देखील होता. सर्वेक्षणनुसार १८.६ कोटीपेक्षा अधिक ग्राहक मोबाइलवर कोणते- कोणते फोटो डाउनलोड करतात करतात याचा शोध घेण्यात आला होता.
सर्वेक्षणानुसार भारतात २०१२ मध्ये ७.५ कोटीपेक्षा अधिक वालपेपर आणि १५ कोटीपेक्षा अधिक संगीत डाउनलोड करण्यात आले आहे. या वर्षी सर्वधिक डाउनलोड करणा-या गाण्यात अग्निपथ सिनेमातील गाणे आणि कैटरीनाचे चिकनी चमेली या गाण्याचा समावेश आहे. हॉलीवुड श्रेणीतील डाउनलोडमध्ये किम कर्दाशियनने सगळ्यान मागे टाकले आहे.
