नरहरी अमीन भाजपात दाखल

अहमदाबाद दि.६ – गुजराथेतील काँग्रेसचे वरीष्ठ नेते नरहरी अमीन यांनी गेल्या आठवड्यात काँग्रेसला रामराम केल्यानंतर आता भाजपात प्रवेश केला असून त्यांच्यासोबत त्यांचे शेकडो समर्थकही भाजपत आले आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा काँग्रेसला मोठा सेटबॅक असल्याचे मानले जात आहे.

नरहरी अमीन यांना काँग्रेसने आत्ताच्या निवडणूकीसाठी तिकीट न दिल्याने ते नाराज होते आणि त्यातूनच त्यांनी काँग्रेस सोडली. भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांचे स्वागत केले असून आता गुजराथच्या जनेतची अधिक चांगली सेवा करणे शक्य होईल असेही म्हटले आहे. नरहरी अमीन यांनीही या निवडणुका सलग तिसर्यां ना तुम्हीच जिंकाल असे मोदींनी सांगितले.

पटेल समाजातील पॉवरफुल नेता म्हणून अमीन यांची ओळख असून त्यांना या समाजाचा भक्कम पाठींबा आहे. अमीन यांनी २५ वर्षे काँग्रेसमध्ये काढली आहेत. अमीन यांच्याबरोबरच अहमदाबाद काँग्रेस प्रमुख पंकज शहा, १८ नगराध्यक्ष,४० वॉर्ड अध्यक्ष यांनीही आपापले राजीनामे काँग्रेस प्रमुखांकडे देऊन भाजपत प्रवेश केला आहे. गुजराथेत विधानसभेसाठी १३ व १७ डिसेंबरला मतदान होत आहे.

Leave a Comment