कामालाच प्राधन्य देते- सोहा अली

‘साहिब, बीवी और गैंगस्टर रिटर्न्सर’ मध्ये अभिनेत्री सोहा अली खान प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचे शूट पूर्ण झाले असून येत्या ८ मार्च रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे. ‘साहिब, बीवी आणि गैंगस्टर’ चा दूसरा भाग तयार झाला असून हा सिनेमा दिग्दर्शक तिगमांशू धूलिया यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाला आहे. गेल्या काही दिवसापासून अभिनेत्री सोहा अली खान हा सिनेमा रिलीज व्हायची वाट पाहत आहे. तिला या सिनेमाकडून खूप काही अपेक्षा आहेत.

अभिनेत्री सोहा अली खान नुकत्याच एका कार्यक्रमात सहभागी झाली होती. याबाबत बोलताना सोहा म्हणाली, ‘ माझा भूमिका असलेला ‘साहिब, बीवी और गैंगस्टर रिटर्न्सर’ हा सिनेमा सध्या तयार झाला आहे. या सिनेमाची कथा आणि रोल्स खुपच मजबूत आहेत. या सिनेमाकडून मला खूप काही अपेक्षा आहेत. या सिनेमासाठी मी कामालाच प्राधान्य दिले असून त्यासाठी खूपच मेहनत घेतली आहे. त्यामुळे हा सिनेमा हिट ठरेल असे वाटते. तिगमांशू हा एक अनुभवी डायरेक्टर आहे. त्याचा सिनेमा पाहणे प्रेक्षक पसंत करतात.’

हा सिनेमा म्हणजे २०११ साली रिलीज झालेल्या ‘साहिब बीवी और गैंगस्टर’ या सिनेमाचा पुढचा भाग आहे. या सिनेमात सोहा आली खानशिवाय जिमी शेरगिल, माही गिल, रणदीप हुड्डा, इरफान खान आणि नेहा धूपिया ही मंडळी काम करीत आहेत .

Leave a Comment