बॉलीवूडमधील हिरोइनमधील कॉम्पिटिशन हे आता नित्यनियमाचे झाले आहे. नेहमीच कुणामध्ये तरी वाद झालेले पहावयास मिळतात. आता अनुष्का आणि दीपिकात स्पर्धा लागली आहे. दोघीपण आपल्या लेवलवर परफेक्ट आहेत. त्यामुळे या स्पर्धेत कोण विजयी होईल हे आताच सांगणे मात्र कठीण आहे.
अनुष्का आणि दीपिकात कॉम्पिटिशन
गेल्या काही दिवसापासून अनुष्का शर्मा आणि दीपिका पादुकोण यांच्यात कॉम्पिटिशन सुरु आहे. दोघीपण एक-दूस-याच्या शेड्यूलवर नजर ठेवत असतात. एवढेच नव्हे तर दोघीपण सिनेमा डील्स करणे व एन्डोर्समेंट्सला फायनल करण्याच्या बाबतीतील सर्वच बाबीवर नजर ठेवून असतात. सध्या या दोघीचे लक्ष साजिद नाडियाडवालाच्या ‘किक’ या सिनेमामावर आहे. अनुष्का आणि दीपिका दोघीनीपण हा सिनेमा आपल्यालाच मिळावा यासाठी फिल्डिंग लावली आहे. साजिद मात्र दोघीना पण पसंद करतो. दीपिकाने हा सिनेमा केला तर डेट्स अडजस्ट करणे तिला अवघड जाणार आहे. मात्र दीपिका डेट्स अडजस्ट करण्यात माहीर आहे. सध्या ती ‘ये जवानी है दीवानी’ या सिनेमाच्या शूटमध्ये बिज़ी आहे. त्यानंतर तिला ‘रामलीला’ साठी वेळ काढावा लागणार आहे. तर ‘रेस-२’ च्या प्रमोशनमध्ये ती व्यस्त आहे.
‘किक’ मध्ये सलमान खान काम करीत असल्याने दोघीपन या सिनेमासाठी इंटरेस्टेड आहेत. दीपिकाला सलमान सोबत काम करण्याची संधी सोडायाची नाही. तर अनुष्का सुद्धा ‘किक’ सिनेमात काम करण्यास उत्सुक आहे. तिच्या करियरच्या दृष्टीने हा सिनेमा महत्वाचा मानला जात आहे.
