बॉलीवूडचा टायगर असलेल्या सलमान खानची क्रेज पाहुन त्याचा बहुचर्चित ‘दबंग-२’ हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर सुमारे महिनाभर कोणताच मोठा सिनेमा रिलीज होणार नाही. तसे पाहिले तर मोठ्या स्टार्सचा सिनेमा रिलीज झाल्यानंतर निर्माता एक ते दोन आठवडे सिनेमा रिलीज करण्याची रिस्क घेत नाहीत. त्यामुळे मोठ्या स्टार्सच्या सिनेमाना कमाई करण्यची संधी मिळते. त्याशिवाय दूस-या निर्मात्या सोबत टक्कर ही होत नाही. दिवाळीत रिलीज झालेल्या शाहरुख खान आणि अजय देवगनच्या सिनेमानंतर आमिर खानचा सिनेमा दोन आठवड्यानंतर रिलीज झाला.
‘दबंग-२ ‘ ची दादगिरी चालणार महिनाभर
मात्र बॉलिवुडचा नंबर वन स्टार असलेल्या सलमान खानची गोष्ट वेगळी आहे. त्यामुळेच इंडस्ट्रीवाले सल्लूचा ‘दबंग-२’ सिनेमा रिलीज झाल्यानंतर एक महीना तर कुठलाच सिनेमा रिलीज होणार नाही. ट्रेड ऐनालिस्ट विजेंद्र नागर यांच्या मते , ‘ या वर्षाच्या अखेरीस म्हणजेच २१ डिसेबरला ‘दबंग-२’ रिलीज होणार आहे. या सिनेमाला विंटर हॉलिडे, क्रिसमस आणि नवीन वर्षाचा फायदा होणार आहे. या सिनेमाला टक्कर देणारा कोणताच सिनेमा येत नसल्याने त्याचा सुद्धा फायदा या सिनेमाला होणार आहे.
दरम्यान, इंडस्ट्रीमधील काही फिल्ममेकर नवीन वर्षाचा फर्स्ट फ्राइडे लकी मानतात. त्यामुळे या फ्राइडेला म्हणजेच ४ जानेवारीला ‘राजधानी एक्सप्रेस ‘ ( लिएंडर पेस) आणि ‘टेबल नंबर २१ ‘ (राजीव खंडेलवाल) यांचे सिनेमे रिलीज होणार आहेत. त्यानंतर ११ जानेवरीला कुठलाच सिनेमा रिलीज होणार नाही. त्यामुळे टायगर सलमानच्या सिनेमाला कमाईसाठी भरपूर संधी आहे.
