सैफ सोबत पाहणार करीना ‘तलाश’

बॉलीवूडची स्टार अभिनेत्री करीना कपूर आता तिचा पती सैफ अली खान सोबत तिचा बहुचर्चित ‘तलाश’ हा सिनेमा पाहण्याची योजना तयार करीत आहे. आमिर खान आणि रानी मुखर्जी यांनी पण या सिनेमात काम केले असून हा सिनेमा शुक्रवारीच रिलीज झाला आहे. या सिनेमात प्रमुख भूमिका असलेली करीना पती सैफ सोबत हा सिनेमा पाहण्यासाठी उत्सुक आहे.

या बाबत आधिक बोलतना अभिनेत्री करीना कपूर म्हणाली, ‘ या वर्षभरात रिलीज झालेले ‘एक मैं और एक तू’ व ‘तलाश’ हे दोने सिनेमे तिने मोठ्या पडद्यावर अजून पहिले नाहीत. या दोन्ही सिनेमामध्ये तिचा रोल नर्वस असा आहे. त्यामुळे तिने हा सिनेमा पाहण्याचे धाडस केले नाही. सैफ आली खान हा लखनऊ वरून १० डिसेबरला येणार आहे. सैफ गेल्या काही दिवसापासून लखनऊ येथे ‘बुलेट राजा’ ची शूटिंग सुरु आहे. त्याच्या कामात तो बीजी आहे. तो आल्यानंतर आम्ही दोघेजण हा सिनेमा पाहण्याची योजना तयार करीत आहे.’

तसे पहिले तर या दोन्ही सिनेमातील माझा अभिनय पाहण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. कारण की मला या सिनेमातील आमिर खानचे काम खूप पसंत पडले आहे. त्याशिवाय जोया आणि रीमानी सुद्धा चांगली साथ दिली आहे. सैफला खूप सिनेमे पाहयला आवडत नाहीत, मात्र तो माझ्या सोबत हा सिनेमा पाहन्यास येणार असल्याचे करीनाने सांगितले.