मला पश्ताप होत नाही- सोनाक्षी

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचे ‘दबंग’ आणि ‘राउडी राठौड’ हे दोन सिनेमे हिट ठरले आहेत. मात्र तिचा या वर्षातील तिसरा सिनेमा ‘जोकर’ मात्र बॉक्स ऑफिसवर प्रेक्षाकानी स्वीकारला नाही. त्यामुळे ती काहीसी नाराज असली तरी तिला या सिनेमात काम केल्यचा पश्ताप होत नसल्याचे तिने कबुल केले आहे.

याबाबत अधिक बोलताना सोनाक्षी म्हणाली, मला ‘ जोकर’ या सिनेमात काम केल्याचा कसलाच पश्ताप होत नाही. माझा सलमान खान सोबतचा ‘दबंग’ हा सिनेमा हिट झाल्यानंतर मी ‘जोकर’ हा सिनेमा स्वीकारला होता. हा माझा दुसरा सिनेमा होता. त्याकाळी अक्षय कुमार सोबत पहिल्यदा काम करण्याची संधी लाभल्याने मी खुश होते. ज्यावेळी मी ‘जोकर’ या सिनेमाचे काम करीत होते त्यावेळी मला ‘राउडी राठौड’ सिनेमात काम करण्यची ऑफर आली होती. तो सिनेमा हिट ठरल्याने माल त्यचे फारसे वाईट वाटले नाही. ‘

‘जोकर’ हा सिनेमा जरी हिट झाला नसला तरी ‘राउडी राठौड’ हा सिनेमा हिट झाल्याने मी खुश आहे. त्यासोबतच अजय देवगण सोबतचा
‘सन ऑफ सरदार’ हा सिनेमा प्रेक्षकाच्या पसंतीला उतरला असल्याने मी सध्या खुश आहे. या सिनेमात मला अजय देवगन आणि संजय दत्त या दिग्गज कलाकारा सोबत काम करण्याची संधी मिळाली. येत्या काळात माझा सलमान सोबतचा ‘दबंग -2’ हा सिनेमा येत असून त्याच्या कडून मला खूप अपेक्षा असल्याचेही सोनाक्षीने सांगितले.

Leave a Comment