सौदी महिलांवर आता ट्रॅकरची नजर

पुरूष बरोबर असल्याशिवाय प्रवासाला बंदी ,वाहन चालविण्याची बंदी अशा अनेक बंद्यामध्ये अडकलेल्या सौदी महिलांना आता आणखी एका बंदीचा सामना करावा लागणार असल्याचे वृत्त आहे. यापुढे देशाची सीमा ओलांडून जाणार्या सौदी महिलांना भले त्यांचे पालक पुरूष बरोबर असले तरीही देशाबाहेर जाताना परवानगी घेणे गरजेचे ठरविण्यात आले असून अशी बंदी मोडली जात नाही ना यासाठी सौदी महिलांवर इलेक्ट्रोनिक ट्रॅकरच्या मदतीने नजर ठेवली जात आहे.

सौदी महिलांना वाहन चालविण्यास बंदी आणणार्याज कायद्यानुसारच ही नवी बंदीही घालण्यात आली असून त्यासाठी इस्लामी लॉ शरियाचा दाखला देण्यात आला आहे. सौदी महिलांच्या पालक पुरूषांच्या मग ते वडील असतील, भाऊ असतील अथवा नवरे असतील मोबाईलवर यासंबंधीचा मेसेज सातत्याने पाठविला जात असून या महिलांना आपला देश सोडून जाताना पालक पुरूषांची परवानगी असल्याचा दाखला ज्याला यलोशीट असे म्हटले जाते ते बरोबर बाळगावे लागणार आहे. या महिला भले त्यांच्या नवर्या सोबतच देशाबाहेर जाणार असल्या तरी त्याची नोंद या दाखल्याद्वारे त्यांना बाहेर जाताना तसेच येतानाही करावी लागणार आहे.

महिलांच्या वाहन चालविण्यावर बंदी असलेला सौदी हा जगातला एकमेव देश आहे.