सनीने सोडले पैशासाठी आयटम सॉंग

सुरुवातीला बिग बॉस त्यानंतर पूजा भट्टच्या ‘जिस्म 2’ या सिनेमातून जलवे दाखवणारी पोर्न स्टार सनी लियोनने सध्या बॉलीवुडमध्ये चांगलेच बस्तान बसविले आहे. दिग्दर्शक अनिल शर्माचा ‘गदर’ हा सिनेमा केवळ आयटम सॉंगमुळे हिट ठरला होता. त्यानंतर त्यांच्या आगामी काळात येत असलेल्या ‘सिंह साहब द ग्रेट’ या सिनेमात सनी लीयोनने आयटम सांग करावे अशी त्यांची इच्छा आहे. मात्र सनीने केवळ पैशासाठी हे आयटम सॉंग करण्यास नकार दर्शविला आहे.

गेल्या काही दिवसापासून सनी आणी अनिल शर्मा यांच्यात चर्चा सुरु होती. मात्र चर्चा पैशाअभावी रखडली आहे. केवळ सनी देओलमुळे सनी लियोनला हे आयटम सोंग मिळले नाही अशी चर्चा आहे. सनीने या आयटम सॉंगसाठी अनिलकडे ज्यादा पैशाची मागणी केली होती. सनीने तिच्या पहिल्या सिनेमासाठी एक कोटी रुपये मानधन घेतले होते. मात्र या आयटम सॉंगसाठी तिने जादा मानधन मागितले होते. याबाबत अधिक माहिती देताना सनी लियोनच्या सूत्रोंने म्हटले आहे की, आयटम सोंग सोडण्याचे कारण हे डेट्‍स असून त्या प्रॉब्लममुळे सिनेमा सोडावा लागला आहे .

अनिल शर्माने रिहर्सलसाठी सुद्धा डेट्‍स मागितली होती. मात्र सनी गेल्या काही दिवसापासून खूपच बिजी आहे. अनिलच्या मते, ‘सनी ‍देओलला सनी लियोन काम करण्यास काहीच अडचण नाही. दोघामध्ये केवळ डे्‍टससंधर्भात चर्चा सुरु आहे. ‘ त्यामुळे आगामी काळत सनी देओलच्या या सिनेमाची सनी लियोन हिस्सा बनणार की नाही हे पाहणे ओत्सुक्याचे ठरणार आहे.

Leave a Comment