मिग-२१ जंगलात कोसळले

भूज: भारतीय हवाई दलाचे मिग -२१ हे लढाऊ विमान अपघातग्रस्त होऊन भूज जवळील जंगलात कोसळले. वैमानिक सुरक्षितपणे त्यातून बाहेर पडला असून त्याला किरकोळ दुखापत खाली आहे. या विमानाच्या अपघाताच्या कारणांची चौकशी केली जाणार असल्याचे हवाई दलाच्या सूत्रांनी सांगितले.

नालीया हवाई तळापासून नियमित सरावासाठी विंग दर्जाच्या वैमानिकाने या विमानातून हवेत झेप घेतली. मात्र हवाई तळापासून ३० किलोमीटर अंतरावर अपघातग्रस्त होऊन ते वन विभागाच्या जमिनीवर कोसळले. हे विमान आकाशातून जमिनीवर कोसळताना कोणत्याही प्रकारची आग दिसून आली नसल्याचे प्रत्यक्षदर्शी वन विभागाचे अधिकारी अतुल दवे यांनी सांगितले.

या अपघाताच्या कारणांची चौकशी करण्याचे आदेश हवाई दल अधिकार्यांनी दिले आहेत.