जेरुसलेम: इस्त्राएल येथील अमेरिकन वकिलातीच्या सुरक्षारक्षकांवर हल्ला चढविणार्या हल्लेखोरावर सुरक्षारक्षकांनी गोळीबार करून प्रत्युत्तर दिले.

जेरुसलेम: इस्त्राएल येथील अमेरिकन वकिलातीच्या सुरक्षारक्षकांवर हल्ला चढविणार्या हल्लेखोरावर सुरक्षारक्षकांनी गोळीबार करून प्रत्युत्तर दिले.
स्थानिक वेळेनुसार मंगळवारी दुपारी ११ वाजता एक हल्लेखोर तेल अव्हीव येथील अमेरिकन वकिलातीच्या इमारतीत घुसला. त्याच्याजवळ सुरा आणि कुर्हाड अशी हत्यारे होती. त्याला अटकाव करणाऱ्या सुरक्षा रक्षकावर हल्लेखोराने हल्ला करून त्याच्या पायावर धारदार शस्त्राचा वार केला. यावेळी आपल्या सहकार्याला वाचविण्यासाठी दुसर्या सुरक्षा रक्षकाने हल्लेखोरावर गोळीबार केला.