मोदी यांनी केले ठाकरे कुटुंबियांचे सांत्वन

मुंबई: गुजरातमध्ये निवडणुकीच्या धामधुमीत असलेले मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘मातोश्री’वर जाऊन ठाकरे कुटुंबियांना धीर दिला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशीही दूरध्वनीवरून संपर्क साधून मोदी यांनी राज यांचे सांत्वन केले.

निवडणूक प्रचार कार्यक्रमात व्यग्र असलेल्या मोदी यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्य दर्शनाला उपस्थित राहता आले नाही. मात्र मंगळवारी दुपारी मोदी यांनी मातोश्री या बाळासाहेबांच्या निवासस्थानी येऊन कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि ठाकरे कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले. गुजरातला परतण्यासाठी निघताना त्यांनी राज यांच्याशीही संपर्क साधला.

Leave a Comment