सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतली

ह्युस्टन दि.१९ – भारतीय वंशाची अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि तिचे दोन साथीदार फ्लाईट इंजिनिअर मालनयेन्को व अकी होशिडे चार महिने अंतराळातील वास्तव्यानंतर पृथ्वीवर परतले आहेत. त्यांना पृथ्वीवर परत आणणारे सोयुझ कझाकिस्तानात आज उतरले. सुनीताने यावेळी १२७ दिवस अंतराळात काढले व त्यापैकी १२५ दिवस अंतराळ स्टेशनच्या बाहेर घालविले.

सुनीताने आत्तापर्यंत दोन वेळा अंतराळात झेप घेतली असून तिने सात वेळा स्पेस वॉक केला आहे. हा काळ ५० तास आणि ४० मिनिटे इतका आहे.. रशियन सोयुझ कमांडर मेलेनचेन्को याने पाच वेळा अंतराळात झेप घेतली असून त्याने ६४२ दिवस अंतराळात काढले आहेत. जगात त्याचा अंतराळात अधिक काळ राहणार्यांवत सातवा क्रमांक आहे असे सांगण्यात आले.