पुणे दि.१९ – दिवाळीच्या तीनही दिवशी म्हणजे लक्ष्मीपूजन, पाडवा आणि धनत्रयोदशीला ग्राहकांनी सराफ बाजारात गर्दी करून सोने चांदी खरेदी केली. मात्र दिवाळीची धांदल ओसरली असताना आता केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशांतर्गत बाजारातही सोने चांदीची मागणी लक्षणीयरित्या घटली असल्याने सोन्याचे दरही दहा ग्रॅम मागे ४०० रूपयांनी उतरले आहेत.
पुण्यातील सराफ व्यावसायिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिवाळीच्या काळात नागरिकांची या धातूंच्या खरेदीसाठी अलट गर्दी झाली होती. मागणी वाढल्याने सोन्याचे दरही ३२ हजारांची पातळी ओलांडून गेले तर चांदीनेही ६२ हजारांचा टप्पा गाठला. मात्र आता मागणी कमी झाली आहे तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातही सोने चांदीचे दर उतरल्याचा परिणाम म्हणून सोन्याचे दर ३१,६०० वर आले आहेत तर चांदीची सुमारे १ हजार रूपयांनी घसरली आहे. दिवाळीच्या काळात सोन्याची मागणी ९ टक्कयांनी वाढली होती.