तीन खान थिरकले एकत्र

शाहरुख खान आणि सलमान खान यांच्यात कैटरीनाच्या वाढदिवसी झालेल्या भाडणानंतर गेल्या चार वर्षापासून अबोला आहे . मात्र यश चोप्रा यांच्या निधनानंतर त्यांचा शेवटचा सिनेमा असलेल्या ‘जब तक है जान’ या सिनेमाच्या रिलीजवेळी एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये तीन खान नुसतेच सहभागी झाले नाहीत तर शाहरुख खान, आमिर खान आणि सलमान खान एकत्रित थिरकताना दिसले.

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार पार्टीमध्ये सलमान व शाहरुखची एकत्र न येण्याची मालिका मुंबईमध्ये सोमवारी झालेल्या ‘जब तक है जान’ या सिनेमाच्या प्रीमियरवेळी खंडित झाली. शाहरुखचा हा सिनेमा असल्याने तो वेळेवर पोहचला. यावेळी तो आलेल्या पाहुणे मंडळीचे स्वागत करताना दिसत होता. या सिनेमाची मुख्य अभिनेत्री कैटरीना कैफचा खास दोस्त असेलेला सलमान खान सुद्धा वेळेवर पार्टीत सहभागी झाला होता. सलमान त्यानंतर खास लोकासाठी आयोजित करण्यात आलेल्या पार्टीमध्ये सुद्धा सहभागी झाला होता. या पार्टीत शाहरुख, कैटरीना कैफ, आमिर खान, अमिताभ बच्चन यांनी एकमेकाची चेष्टा सुद्धा केली. यावेळी सलमान आणि शाहरुखने थोडीसी चर्चा केली व त्यानंतर एकत्रित डान्स सुद्धा केला.

त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या डान्स पार्टीमध्ये शाहरुख, सलमान आणि आमिर खान एकत्रित थिरकत होते. विशेष म्हणजे यावेळी बच्चन परिवार देखील उपस्थित होता. अमिताभच्या सोबत जया बच्चन, अभिषेक आणि ऐश्वर्या देखील आले होते. यावेळी सलमान आणी ऐश एकमेकासमोर आले की नाही हे मात्र समजू शकले नाही.