एनआरआयचा भारतात प्रॉपर्टी खरेदीवर भर

गेले वर्षभर अमेरिकी डॉलरच्या तुलनेत घसरत चाललेल्या रूपयामुळे अरब अमिरातीतील अनिवासी भारतीयांनी भारतात १ कोटी अथवा त्यापैक्षा अधिक किमतीच्या प्रॉपर्टी खरेदी करण्यावर भर दिला असल्याचे स्पष्ट झाले आहे. सुमान्सा एक्झिबिटर्स यांनी आयोजित केलेल्या इंडियन प्रॉपर्टी शो मध्ये ही वस्तुस्थिती स्पष्ट झाली आहे.

या कंपनीचे सीईओ सुनील जैयस्वाल यासंबंधी अधिक माहिती देताना म्हणाले की प्रॉपर्टी शो मध्ये विकल्या गेलेल्या प्रॉपर्टीतील ८९ टक्के हिस्सा अमिरातीतील अनिवासी भारतीयांचा आहे. त्यांनी १ कोटी अथवा त्यापैक्षा अधिक किमतीच्या प्रॉपर्टीज खरेदी करण्यास प्राधान्य दिले आहे. रूपयाच्या घसरणीमुळे दिरहॅम या अरबी चलनाचा दरही वाढला असून या अनिवासी भारतीयांच्या इनकममध्ये रूपयांत जादा वाढ होत आहे. त्यात भारतात सध्या मार्केट मंद आहे त्यामुळे तुलनेने चांगल्या मालमत्ता स्वस्तात उपलब्ध होत आहेत आणि याचा फायदा अनिवासी भारतीय घेत आहेत.

अरब अमिरातीतील अनिवासीयांची संख्या लक्षणीय आहे कारण तेथे भारतीयांना मालमत्ता विकत घेता येत नाही. त्यामुळे आपल्या देशात आणि त्यातही घरात गुंतवणूक करणे त्यांना अधिक सुरक्षित वाटते तसेच त्यामुळे घरी परतण्याचे फिलिंगही मिळते. शिवाय घरांच्या किमती कधीच कमी होत नसल्याने या गुंतवणुकीतून मिळणारा परतावाही चांगलाच असतो. या वर्षात अशी गुंतवणूक करणार्यां चे प्रमाण सहा टक्कयांनी वाढलेले दिसून येत आहे.

या अनिवासी भारतीयांनी घरांत गुंतवणूक करण्यासाठी मुंबई, बंगलोर, दिल्ली या शहरांना अधिक प्राधान्य दिले असून या शहरातील मालमत्तांना चांगला परतावा मिळण्याची खात्री वाटत असल्यानेच या शहरांना पसंती दिली गेली असल्याचेही दिसून आले आहे.