क्रिकेटसाठी हिंदी कॉमेट्री गरजेची- कपिल देव

भारत आणि इंग्लंडयांच्यातील कसोटी सामन्याच्या मालिकेसाठी ‘स्टार क्रिकेट’ वर हिन्दी कमेंटेटर म्हणून माजी क्रिकेटपटू कपिल देव नवीन विनिंग सुरु करीत आहे. माजी कप्तान कपिल देवच्यामते भारतामध्ये क्रिकेटला जीवंत ठेवायचे असले तर आगमी काळात हिन्दी कॉमेट्री गरजेची आहे. आगामी काळात स्टार क्रिकेटने कपिलदेव सोबतच प्रसिद्ध क्रिकेटर नवजोत सिंह सिद्धूलापण हिन्दी कॉमेट्रीसाठी करारबद्ध केले आहे. भारत आणि इंग्लंडयांच्यातील चार कसोटी सामन्याची कामेंट्री स्टार क्रिकेटवर हिन्दीतून सांगितली जानार आहे.

कपिल देव या नवीन विनिगबद्दल अधिक बोलताना म्हणाला, ‘ पुढील काळात मला हिंदी कॉमेट्री करावयची असल्याने खूप चांगले वाटत आहे. स्टार क्रिकेटचा हा एक चांगला प्रयत्न आहे. केवळ त्यांनी हिन्दी भाषाची ओळख जाणली आहे. हिन्दुस्तानमध्ये आगामी काळात जर क्रिकेटला ख-या अर्थाने जिवंत ठेवायचे असेल तर हिन्दी कामेंट्री गरजेची आहे. मला हे काम करण्यची इच्छा खूप दिवसापासूनची होती. मात्र अशी संधी मिळत नव्हती. यापूर्वी केवळ मेट्रोवरून हिंदी कॉमेट्री सांगितली जात होती, मात्र आता सर्वत्र हिंदी भाषेचा प्रसार झाला आहे.’

टीम इंडियामधील कप्तान महेंद्र सिंह धोनी झारखंडमधून आला आहे. तर हरभजन सिंह जालंधरमधून आला आहे. जहीर खान श्रीरामपुर सारख्या ग्रामीण भागातून आला आहे. आतापर्यंत त्यांची इच्छा असूनही त्याना हिंदी कॉमेट्री ऐकता येत नव्हती. या सर्व खेळाडूंना आता इंग्लंडविरुद्धच्या सामन्यावेळी हिन्दी कॉमेट्री ऐकता येणार आहे.