कारखानदारांची दुहेरी नीती

sugarfactory

महाराष्ट्रात सहकारी तत्वावर साखर कारखाने काढण्यात आले. साधारणपणे विसाव्या शतकाच्या पाचव्या दशकात या चळवळीला मोठीच गती आली. नंतर महाराष्ट्र संयुक्त झाला. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. ते स्वतः शेतकरी कुटुंबातून पुढे आलेले होते आणि त्यांना शेतकर्यांाच्या प्रश्नांची चांगली जाण होती. म्हणून त्यांनी सहकारी साखर कारखानदारीला चांगलीच गती दिली. तत्पूर्वी साखर कारखानदारी पूर्णपणे खाजगी होती आणि या खाजगी साखर कारखानदारांनी शेतकर्यांंचे फार शोषण केलेले होते.

या कारखान्यांना महाराष्ट्रात साखर कारखानदारीला किती संधी आहे याची चांगलीच जाणीव होती. म्हणून त्यांनी खाजगी साखर कारखाने काढले. परंतु त्यांना उसाचा कायमचा आणि हक्काचा पुरवठा होण्याची खात्री वाटत नव्हती. कारण शेतकरीवर्ग कधीही नियोजनबद्ध पद्धतीने शेती करत नसतो. सगळे शेतकरी एखादेच पीक एकदम घेतात आणि बाजारात त्या मालाची आवक जास्त होते. तसे झाले की भाव कोसळतात. हे सारे माहीत असून सुद्धा शेतकरी याच पद्धतीने शेती करत असतात.

त्या महाराष्ट्रातल्या खाजगी कारखानदारांना ही गोष्ट चांगलीच लक्षात आली होती. म्हणून त्यांनी उसाचा हक्काचा आणि कायमचा पुरवठा व्हावा यासाठी स्वतःच शेती करायला सुरुवात केली. शेतकर्यां्च्या जमिनी खंडाने घेतल्या. त्यासाठी शेतकर्यांजशी प्रदीर्घ काळचे करार केले. म्हणजे शेतीचा मालक शेतकरी असला तरी ती शेती खाजगी साखर कारखानदारच करायला लागले. त्यातून शेतकर्यांरची खूप लूट झाली आणि या जमिनी त्यांच्या हातून गेल्या. त्यातूनही ज्या शेतकर्यां च्या जमिनी राहिल्या होत्या त्यांच्या शेतातल्या उसाला चांगला भाव मिळत नव्हता.

खाजगी कारखानदार उसाचा भाव नेहमीच पाडत असत आणि स्वस्त उसापासून तयार झालेली साखर मात्र महागात विकून प्रचंड नफा कमवत असत. महाराष्ट्रातल्या काही शेतकरी नेत्यांनी आणि अर्थतज्ज्ञांनी शेतकर्यां ची या लुटीतून मुक्तता व्हावी याकरिता खाजगी कारखाने बंद करणे आणि ते सहकारी करून शेतकर्यांाना चालवायला देणे, असा नवा उपक्रम सुरू केला. हे सहकारी साखर कारखाने शेतकर्यां च्या मालकीचे झाले. कारण ते त्यांच्या शेअर्समधून उभे केलेले होते. सहकारी साखर कारखानदारीचे स्वरूप थोडे समजून घ्यावे लागेल.

या कारखानदारीमध्ये उसाचा पुरवठा करणारा शेतकरी हाही शेतकरीच आणि साखर कारखान्याचा मालकही तोच. म्हणजे ऊस देणारा तोच आणि घेणाराही तोच. मग कोणी कोणाची लूट करण्याचा किंवा कोणी कोणाचे शोषण करण्याचा मुद्दाच संपला. साखर कारखाने आणि शेअर्स घेणार्यार शेतकर्यां चा काही एकर ऊस हमखास विकत घेण्याचा करार करायचा आणि तेवढा ऊस तोडून न्यायचा. ऊस तोडून नेताना काही अंदाज करून ठराविक भाव द्यायचा. गाळप संपल्यानंतर सगळ्या गाळपाचा हिशेब करायचा आणि साखरेला आलेल्या भावानुसार जो नफा उरत असेल तो पुन्हा दुसर्याद आणि तिसर्याा हप्त्याच्या रुपाने पुन्हा सभासद शेतकर्यांलना वाटायचा, असे हे तत्व होते.

शेतकरी सभासदांनी कारखान्याचा कारभार बघण्यासाठी संचालक निवडायचे आणि संचालकांनी हा सारा हिशोब प्रामाणिकपणाने करायचा, असे गृहित धरलेले होते. हे संचालक शेतकरीच असल्यामुळे ते शेतकर्यां्ना लुटणार नाहीत आणि सर्वजण मिळून साखर कारखाना छान चालवतील, ज्यातून शेतकर्यांेची शोषणातून मुक्तता होईल असे या सहकाराच्या तत्वामागे गृहित धरलेले होते. खाजगी साखर कारखान्याकडून होणार्याो लुटीतून शेतकर्यां ची सुटका व्हावी हा या कारखानदारीमागचा हेतू होता. महाराष्ट्र शासनाचे ते पुरोगामी पाऊल होते.

कारखाने काढताना काहीही गृहित धरलेले असले तरी शेतकर्यां नी निवडलेले संचालक शेतकर्यांाचे हित बघण्याऐवजी स्वतःचेच हित बघायला लागले आणि उसाला जास्तीत जास्त भाव मिळावा यासाठी शेतकर्यांडना या आपल्या प्रतिनिधीशींच संघर्ष करावा लागला. त्यामुळे या शेतकर्यांाच्या प्रतिनिधींपेक्षा जुन्या काळातले खाजगी कारखानदारच परवडले, असे म्हणण्याची वेळ आली. सहकारी साखर कारखान्यांचे संचालक शेतकर्यांाची लूट करून सुद्धा खोटे खोटे रडत होते. साखर कारखाना चालवणे फार अवघड आहे, ती तारेवरची कसरत आहे अशा प्रकारे ढोंगीपणा ते करत होते.

परंतु गमतीचा भाग असा की, साखर कारखाना चालवणे एवढे अवघड आहे म्हणणारे हे सारे संचालक सहकारी साखर कारखान्यांतून मिळवलेल्या पैशातून आता खाजगी कारखाने काढायला लागले आहेत. महाराष्ट्रामध्ये गेल्या काही वर्षात जवळपास ६० खाजगी साखर कारखाने निघाले आहेत. हे सारे कारखाने कारखाना चालवणे फार अवघड असते, असे म्हणून रडणार्याह सहकारी साखर कारखानदारांनीच काढलेले आहेत आणि अजून काढत आहेत. ते वरकरणी कितीही रडत असले तरी आतून त्यांना, या कारखानदारी प्रचंड नफा आहे, कारण कच्च्या मालाचा पुरवठा करणारा शेतकरी भोळा आहे हे पक्केपणी माहीत आहे. एकेकाळी खाजगी कारखानदारी म्हणजे भांडवलशाही आणि सहकारी कारखाना म्हणजे पुरोगामीपणा अशी जपमाळ ओढणारे हेच कारखानदार आता खाजगी कारखाने काढत आहेत. मग तो प्रतिगामीपणा नव्हे का?

Leave a Comment