काही दिवसापासून टेनिस कोर्टवरून ब्रेक घेऊन भारताची स्टार खेळाडू सानिया मिर्जा रैंपवर उतरली होती. यावेळी तिने खपू एन्जॉय ही केला. यावेळी तिने तिच्या मैरिड लाइफ पासून ते फिटनेस मंत्राबाबत मनमोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी तिने काही किस्से ही शेयर केले. त्याशिवाय तिने काही आतापासुनच ठरविलेले फ्यूचर प्लैनिंग सुद्धा सांगितले.
याबाबत बोलताना सानिया मिर्झा म्हणाली, ‘ ईमानदारीने सांगायचे झाले तर मला अजूनही वाटते की माझे लग्न झालले नाही. मला वाटते की मी अजूनही शोएब सोबत डेटिंगच करीत आहे. असे वाटण्याचे कारण पण तसेच आहे, मी आणि शोएब सारखेच ट्रैवल करत असतो. त्यामुळे आमच्या दोघाचे शेड्यूल खूप कमी वेळा मोकळे असते. आमचे शेडूल सतत बीजी असले तरी उरलेला वेळ एकमेकासोबत घालवीत असल्याने मैरिड लाइफ वंडरफुल आहे. मी वजन कमी करण्यासाठी स्पेशल असे काहीच करत नाही. माझ्या दरोरजच्या वर्कआउट शेड्यूलमध्ये फक्त काही नवीन बाबी समाविष्ट केल्या आहेत. ‘
मी आतापर्यंत तीन मेजर सर्जरीज़ आणि दोन मेजर एन्जुरी फेस केल्या आहेत. मी ज्यावेळी करियरच्या पीकवर पोहचते. त्यावेळी मला नेमकी कुठे तरी एन्जुरी होते. सध्या मी कमबैक करण्यावर फोकस केला आहे. यासाठी मला फैमिली आणि हज़्बंड शोएबचा सपोर्ट मिळाला आहे. मला वाटते की, भविष्यात फक्त सिंगल्स खेळत राहावे. सध्या तरी काही आठवडे ब्रेक घेतला आहे. त्यानंतर मी कोर्टवर सराव करणार आहे. त्यानंतर मला काय प्रॉब्लम फेस करावा लागणार आहे, याचा अंदाज घेऊन सिंगल खेळण्याबाबत निर्णय घेणार असल्याचे सानिया म्हणाली.