ऐतिहासिक विंचूरकर वाडा इतिहासजमा

पुणे दि.८ -पुणे शहराच्या इतिहासात मानाचे स्थान असलेला सदाशिव पेठ पोस्टासमोरील विंचूरकर वाडा पाडण्याचे काम सुरू झाले असून २५० वर्षे जुना असलेला हा वाडा आता इतिहासजमा होणार आहे.

लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची मेढ या वाड्यातच रोवली होती आणि येथेच पहिला सार्वजिनिक गणपती ११८ वर्षांपूवी म्हणजे १८९४ साली बसविला गेला होता. याच वाड्यात १९१५ सालात लोकमान्य टिळक आणि स्वामी विवेकानंद यांची भेट झाली होती. काळाच्या ओघात मोडकळीस आलेल्या या वाड्याच्या जागी आता भव्य टोलेजंग पाच मजली इमारत उभी राहात असून हे काम परांजपे बिल्डर्स करणार आहेत. गेली तीन वर्षे या वाड्याच्या पुननिर्माणासाठीच्या चर्चा सतत केल्या जात होत्या.

हे बांधकाम पूर्ण होण्यास किमान दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे पुढील वर्षी येथील गणपती उत्सव जागेअभावी अगदी किरकोळ स्वरूपातच केला जाणार असल्याचे मंडळाचे खजिनदार रविंद्र पाठारे यांनी सांगितले. परांजपे बिल्डर्स या मंडळासाठी नवीन इमारतीत २५०० चौरस फूट जागा देणार आहेत. या जागेत गणपतीची स्थापना करण्यात येणार असून लाईट आणि साऊंड शो सुरू करण्याचा विचार असल्याचेही पठारे म्हणाले.

Leave a Comment