न्यू जर्सी दि. ५ – अमेरिकेतील किनारपट्टीला दणका दिलेल्या सँडी चक्रीवादळामुळे तेथील जनजीवन अद्यापीही पूर्वपदावर आले नसतानाही ६ नोव्हेंबरला होणार्यार राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या मतदानासाठीची व्यवस्था पूर्ण झाली असून मतदान केंद्रे म्हणून लष्करी ट्रकची व्यवस्था करण्यात आली आहे. अनेक भागातील वीजपुरवठा अद्यापीही सुरळीत झालेला नाही त्यामुळे मतदान पत्रिकांच्या सहाय्याने नागरिकांची मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे.
वादळग्रस्त भागात लष्करी ट्रकमध्ये मतदान केंद्रे
न्यूजर्सीचे निवडणूक बोर्डाचे अध्यक्ष ले. गव्हर्नर किम गुडमाना यासंबंधी माहिती देताना म्हणाल्या की न्यूजर्सीतील लक्षावधी नागरिक अजून वादळाच्या धक्क्यातून सावरलेले नाहीत. त्यामुळे निवडणुकीसाठी मतदान करण्याच्या मनस्थितीत ते नाहीत याची आम्हाला जाणीव आहे. मात्र या नागरिकांना आपला राष्ट्राध्यक्ष निवडण्याचा पूर्ण अधिकार असल्याने त्यांना सहज आणि सुलभतेने मतदान करता यावे याची व्यवस्था आम्ही करतो आहोत. वीज नसल्याने मतदान केंद्रे काम करू शकत नाहीत. अनेक ठिकाणी ही स्थानेही भुईसपाट झाली आहेत. त्यामुळे जागोजागी लष्करी ट्रक पोलिंग स्टेशन म्हणून वापरले जात आहेत. अनेक मतदारांना मतपत्रिका घरीही देण्याची व्यवस्था केली गेली आहे. नागरिक पत्रानेही मत देऊ शकणार आहेत. विशेषतः जे नागरिक शेल्टर होममध्ये आहेत त्यांच्यासाठी ही सोय करण्यात आली आहे.
न्यू यॉर्कमधील निवडणूक अधिकार्यां नी दिलेल्या माहितीनुसार मतदानासाठीची वेळ यंदा वाढविण्यात आली असून पोस्टानेही मत पाठविण्याची सुविधा दिली असल्याने मतमोजणीसाठी वेळ लागण्याची शक्यता आहे. अर्थात सर्व अडचणींचे निवारण करून मतदान प्रक्रिया पारदर्शी करण्यासाठीचे सर्व प्रयत्न करण्यात येत आहेत.
