श्रीनगर दि.५ – नोव्हेंबर महिना हाडे गोठविणारी थंडी घेऊन काश्मीरात आला असतानाच येथील केशर उत्पादक शेतकर्यां ना मात्र ही थंडी उबदार भासते आहे कारण यंदा काश्मीरमध्ये केशराचे चांगले पीक आले आहे. पांपोर हे केशरासाठी प्रसिद्ध असून पहाटेपासूनच येथील केशराच्या शेतात पाठीला टोपल्या लावून केशर फुले गोळा करणार्याू महिलांची एकच गर्दी दिसू लागली आहे. केशराच्या सुगंधाने आसमंत दरवळतो आहे.
सोन्यापेक्षा कित्येक पटीने महाग असलेले केशर येथील शेतकर्यांनसाठी वरदान देणारे पीक ठरत असते. त्यातून काश्मीरी केशराचा दर्जाही जगात सर्वोत्तम आहे आणि त्यामुळे हे केशर दीड ते दोन लाख रूपये किलोने विकले जाते. यंदा केशर पीक चांगले येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. काश्मीरच्या कृषि विभागाचे संचालक फारूख अहमद यांच्या मते सुरवातीला थंडीचा जोर फारसा नव्हता त्यामुळे पीक कितपत येणार यांची शंका होती मात्र नंतर हवामान सुधारले आणि चांगले पीक येईल हे आता स्पष्ट झाले आहे. यंदा सुमारे ११ मेट्रिक टन केशर उत्पादन होईल असा अंदाजही त्यांनी दिला.
काश्मीर खोर्यारत ३७०० हेक्टरवर केशर लागवड आहे. त्यात पांपोर व्हॅलीत सर्वाधिक क्षेत्र आहे. किश्तवार जिल्ह्यातही १०० हेक्टरवर लागवड आहे. उत्पादकांच्या मते हल्ली केशर उत्पादन घटत चालले आहे. गेल्या कांही वर्षांपूर्वी ३० ते ४० हजार किलो उत्पादन होत होते आणि तेव्हा अडीच ते तीन लाख रूपये किलोने विकले जात होते मात्र आता दरही घटले आहेत आणि उत्पादनही. त्यातून इराणचे स्वस्त केशर, विक्रीकर, मार्केटिगची अपुरी सुविधा यामुळेही शेतकर्यांेना चांगले उत्पन्न मिळत नाही.
काश्मीरी केशरात जे औषधी गुणधर्म आहेत ते इराणी किवा स्पनिश केशरात नाहीत. या केशराचा रंग आणि सुवास याला जगात तोड नाही. काश्मीरमध्ये केशर लागवड वाढविण्यासाठी ठिबक सिंचन, सॅफ्रॉन पार्क, सल्ला मार्गदर्शन अशा अनेक सुविधा पुरविल्या जात आहेत. नॅशनल सॅफ्रॉन मिशन खाली यंदा १००० हेक्टर जमीन लागवडीखाली आणली गेली आहे असेही कृषि विभागाकडून सांगण्यात आले.