कैटरीनाची बहिण व अनिल कपूरचा मुलगा एकत्र

बॉलीवूडची चिकनी चमेली कैटरीना कैफ सध्या इंडस्ट्रीजमधील स्टार कलाकारांपैकी एक आहे. आता लवकरच तिची बहिण इसाबेल ही पण बॉलिवुडमध्ये एंट्री करत आहे. बॉलीवूडचा लाइफ टाइम हिरो असलेला अनिल कपूरचा मुलगा हर्ष सोबत ती डेब्यू करीत आहे.

हर्ष आणि इसाबेल काम करीत असलेला हा एक शॉर्ट सिनेमा आहे. हा सिनेमा स्टेवन रॉय थॉमस डायरेक्ट करीत आहे. या सिनेमाचे शूट गेल्या काही दिवसापासून न्यूयॉर्क मध्ये सुरु आहे. या सिनेमाला बॉलिवुड टच देण्यासाठी आगामी काळात त्याचे बरेचसे शूट मुंबई मध्ये केले जाणार आहे.

अनिल कपूरचा मुलगा हर्ष याची बॉलिवुडमध्ये चांगली ओळख आहे. त्याचा सध्या तो फायदा करून घेत आहे. तो बॉलीवूडमध्ये जबरदस्त एन्ट्री करणाच्या विचारात आहे. गेल्या काही दिवसापासून तो कैलिफोर्निया मध्ये शिक्षण घेत आहे. मात्र जरी तो शिक्षण घेत असला तरी त्याची बॉलीवूड मध्ये काम करण्यची इच्छा आहे. आगामी काळात तो त्याची बहिण सोनम कपूर प्रमाणे चांगला परफॉर्मेंस देण्यचा प्रयत्न करीत आहे. सोनमप्रमाणे त्याला ही काही तरी एन्ट्री करताना वेगळे काही तरी करून दाखवायचे आहे. दुसरीकडे कैटरीना कैफची बहिण इसाबेल सुद्धा गेल्या अनेक दिवसापासून बॉलिवुडमध्ये एंट्री करण्यासाठी चांगल्या प्रॉजेक्टची वेट करीत होती. मात्र तिला या शॉर्ट सिनेमाच्या माध्यमातून संधी मिळाली आहे.