संशोधकांनी महागडी आयपॅडसारखी डिव्हायसेस धुता येतील किवा घडी घालून ठेवता येतील असे तंत्रज्ञान शोधले असल्याचा दावा केला आहे. जनरेशन नेक्स्टची ही उपकरण मालिका इलेक्ट्रोफ्ल्युइडिक इमेजिंग फिम्म पासून बनविली गेली असून त्यांना विजेची गरज नाही. सूर्यप्रकाश अथवा खोलीत येणार्याक सूर्यकिरणांवर ही चार्ज होऊ शकणार आहेत. मात्र असे असले तरी ती वापरायला चांगली टफ आहेत आणि त्यांना फक्त वायरलेस कनेक्शन पोर्टच जोडण्यात आली आहेत. त्यामुळे फोन पावसात राहिला, भिजला तरी कोणतेही नुकसान होणार नाही. अतिशय पातळ व लवचिक कव्हर स्क्रीनमुळे तो हातातून पडला किवा धुतला गेला तरीही कांही धोका नाही असे संशोधकांचे म्हणणे आहे.
ई डिव्हायसेस आता खुशाल दुमडा किवा पाण्याने धुवा
सिनसिनाटी विद्यापीठातील संशोधकांनी हे संशोधन केले असून त्यांच्या मते ईपेपर फोल्डेबल उपकरण बनविताना सर्वात मोठी अडचण स्क्रीनबाबत होती. कारण हे स्क्रीन कडक काचेचे बनविलेले असतात. मात्र त्यांनी त्याजागी कागदासारख्या पातळ प्लॅस्टीकचा यशस्वी वापर केला. त्यासाठी इलेक्ट्रोफ्युईडिक इमेजिग फिल्मचा वापर करण्यात आला.यामुळे आता ही उपकरणे ग्रीन आयपॅड होतीलच पण त्यातील ई रिडरमध्ये हायकलर हायफंक्शन यांचे कॉम्बिनेशन केल्याने कोणत्याही रंगात स्क्रीन पाहता येईल. बॅटर्याे नसल्याने ही उपकरणे वजनालाही अतिशय हलकी असतील आणि घडी घालून खिशात ठेवता येतील असाही त्यांचा दावा आहे.
