बॉलीवुडमध्ये कधी कोणाला कुणाचा रोल करण्याची इच्छा होईल हे सांगता येत नाही. आता आपल्या बॉलीवुडचा ‘डॉन’ असलेल्या शाहरुख खानलाच गेल्या काही दिवसापासून जेम्स बॉन्डचा रोल करायचा आहे. शाहरुखला अशा प्रकारचा रोल करायचा आहे याची कल्पना जेम्स बॉन्डचा रोल साकारणा-या हॉलीवुड अभिनेता डेनियल क्रैगला झाली आहे. शाहरुख जेम्स बॉन्डचा इतका दीवाना झाला आहे की, मुंबईमध्ये त्याने त्याच्या आगामी काळात येत असलेल्या ‘जब तक है जान’ या सिनेमाच्या प्रमोशनवेळी अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि कटरीना कैफ सोबत बॉन्ड स्टाइल फोटो काढले आहेत.
डॉन शाहरुखला व्हायचे आहे जेम्स बॉन्ड
यावेळी शाहरुख म्हणाला की, ‘मी जेम्स बॉन्डचा मोठा फॅन आहे. मला नेहमीच त्याचा रोल करण्याची इच्छा होते. मात्र माझ्या बाबतीत नेहमीच म्हटले जाते की, मी तरुण मुली सोबत व बंदुकीसोबत जास्त दिसत नाही.’ शाहरुखला जेम्स बॉन्डचा रोल करायची आहे, याची माहिती ‘स्काइफॉल’ या बॉन्डच्या मालिकेतील तीसरा सिनेमा करीत असलेल्या डेनियल क्रैगला झाल्यानंतर त्याने शाहरुखचे अभीनंदन केले आहे. आता शाहरुखने हा रोल जर करायचा ठरवला असेल तर लवकरच माझी नौकरी जाऊन सुट्टी होणार असे दिसते. शाहरुखमध्ये कसलीच कमी नसल्याचे त्यानेम्हटले आहे.
शाहरुख़ आगामी काळात बॉन्ड व्हायचा आहे, त्यावेळेस होईल. मात्र सध्या त्याचा बहुचर्चित असलेला ‘जब तक है जान’ हा सिनेमा रिलीजसाठी तयार आहे. हा सिनेमा सर्वत्र १३ नोव्हेंबर रोजी रिलीज होणार आहे. त्यामुळे हा सिनेमा १०० कोटीचा बिजनेस करणार की नाही यावर सध्या शाहरुखने लक्ष केंद्रित केले आहे.
