स्वीसची यूबीएस बँक तोट्यात

जगभरातील धनाढ्यांचा आणि करचुकवेगिरी करणार्याे बदमाशांचा काळा पैसा दडवून ठेवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या व झुरीच येथे मुख्यालय असलेल्या यूबीएस या स्वीस बँकेला  तब्बल २.२ अब्ज स्वीस फ्रँक तोटा झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे गतवर्षी याच तिमाहीत या बँकेने १ अब्ज फ्रँकचा निव्वळ नफा कमावला होता.

यूबीएस बँकेचे सीईओ एर्मट्टी यांच्यामते जगभरातील लोकांची काळजी वाहणार्याव त्यांच्यासारख्या बँका तोट्यात जाणे हे वाईट लक्षण असून त्यामुळे व्यवसायात अवघड परिस्थितीला तोंड देण्याची पाळी त्यांच्यावर आली आहे. या तोट्यातून बाहेर पडण्यासाठी बँक अनेक उपाययोजना करत असून त्यात २०१५ सालापर्यंत १० हजार कामगारांना नोकरीतून कमी करण्यात येणार आहे. यामुळे बँकेची५.८ अब्ज फ्रंॅकची बचत होणार आहे. सध्या या बँकेत जगभरात ६३,७४५ कर्मचारी काम करत आहेत. बँक निश्चित परतावा देणार्याय कांही योजनाही बंद करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

बँकेची पुनर्रचना होणार असल्याचा अफवा गेले कांही दिवस सातत्याने उठत होत्या व त्यामुळे स्वीस शेअर बाजारावरही त्याचा परिणाम झाला होता. आता नोकरकपातीची घोषणा केल्यानंतर शेअर बाजार थोडा सुधारला असल्याचेही सांगण्यात आले आहे.