रँकिंगमधील स्थान कायम ठेवणार- स्मिथ

जागतिक कसोटी क्रमवारीतील अव्वल स्थान टिकवून ठेवण्यासाठी सध्या ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रीका यांच्यातील मालिका रंगणार आहे. चारवर्षापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या धर्तीवर दक्षिण अफ्रीका संघाने त्यांचा पराभव केला होता. त्यामुळे यावेळेस सुद्धा दक्षिण आफ्रिका संघ विजयी होऊन त्याचे अव्वल स्थान टिकवून ठेवेल अशी खात्री कर्णधार स्मिथने व्यक्त केली.

२००८ साली आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाविरुद्धची सीरीज २-१ ने जिंकली होती. त्यामुळे अजून त्यांचा आत्मविश्वास कायम आहे. दक्षिण अफ्रीका संघाचा कर्णधार स्मिथ म्हणाला, ‘ पहिला सामना जिंकून आघाडी घेण्याचा विचार आमचा संघ करीत आहे. त्यामध्ये आम्ही यशस्वी ठरू असा आमचा आत्मविश्वास आहे. त्यामुळे आगामी काळात आम्ही आत्मविश्वास कायम ठेवून येणारे संकट दूर करून केवळ विजय मिळवण्याच्या निर्धाराने खेळणार आहोत’

काही दिवसापूर्वी इंग्लड विरुद्दच्या मालिका २-० अशी जिंकल्याने दक्षिण अफ्रीका संघाचा विश्वास दुणावला आहे. या विजयामूळे दक्षिण अफ्रीकेचा संघ जागतिक कसोटी क्रमवारीत टीम नंबर वन झाला आहे. त्यामूळे आगमी काळात हे स्थान टिकून त्यांना ठेवन्यासाठी त्यांना ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत विजय मिळवणे आवश्यक आहे.