अभिनेता अमीर खानने ‘तलाश’च्या प्रेमोपासून दूर राहण्यासाठी चागलीच शक्कल लढवली आहे . तो सध्या त्याच्या आई सोबत ४० दिवसाच्या हज यात्रेवर गेला आहे. त्यामुळे सध्या ‘तलाश’च्या संपूर्ण टीममध्ये चिंतेचे वातावरण आहे. सिनेमा रीलीज होण्यापूर्वी तो केवळ १५ दिवस आधी हज यात्रेवरून येणार असल्याचे समजते.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार यामधून सुटका व्हावी या उद्देशाने अमीरने जाणून बुजून हज यात्रेसाठी जाण्यचा निर्णय घेतला असलायचे समजते. त्याचा बहुचर्चित असलेला ‘तलाश’ हा सिनेमा पुढच्या महिन्यात रिलीज होणार आहे. त्याचा हा सिनेमा विद्या बालनच्या ‘कहाणी’ या सिनेमाशी मिळता जुळता आहे. केवळ या सिनेमाचा क्लाइमेक्स बदल करण्यात आला आहे. दोन्ही सिनेमाच्या स्टोरीलाइन मध्ये बरीचसी समानता आहे. अमीर ज्यावेळी हज यात्रेवरून परत येणार आहे. त्यावेळी खूप कमी वेळ राहणार आहे. त्यामुळे या सिनेमाचे प्रमोशन कोण करणार असा प्रश्न सर्वाना भेडसावत आहे.
काहीच्या मते या सिनेमात खूपच ट्विस्ट असल्याने आगामी काळात प्रेक्षकांना एक दर्जेदार सिनेमा पाहण्यास मिळणार आहे. त्यांनी हज यात्रला जाण्यचा प्लान एक वर्षापुर्वी केला होता. हज यात्रेला घेऊन जाण्याचा शब्द तिने तिच्या आई झीनतला दिला होता. त्यामुळे अमीर हज यात्रेला गेला आहे. हज यात्रेवरून आल्यानंतर १५ दिवसाचा वेळ प्रमोशनसाठी मिळणार आहे. त्यामुळे या १५ दिवसात तो प्रमोशनचे काम करणार असल्याची माहिती या सूत्राने दिली.